Salim Kutta

Salim Kutta : भाजप आमदार नितेश राणे यांनी आरोप केलेला सलीम कुत्ता नेमका आहे तरी कोण?

746 0

भाजप आमदार नितेश राणे यांनी आज ठाकरे गटाचे नाशिक शहराचे विद्यमान महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बडगुजर यांचे बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीम याचा उजवा हात समजला जाणाऱ्या सलीम कुत्ताशी (Salim Kutta) संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या दोघांचा पार्टी करताना व्हिडीओदेखील आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी विधानसभेत केला होता. यामुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. हा सलीम कुत्ता नेमका आहे तरी कोण? त्याचा दाऊदशी नेमके काय कनेक्शन आहे? त्याबद्दल चला तर मग जाणून घेऊया…

कोण आहे सलीम कुत्ता?
सलीम हा कुत्ता दाऊद इब्राहिम टोळीचा मुख्य शूटर होता. त्याचं खरं नाव मोहम्मद सलीम मीर शेख आहे. अनेक मोठ्या गुन्ह्यांच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. सलीम हा कुत्ता दाऊदचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या छोटा शकीलसोबत काम करत होता. सलीम कुत्ता 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आहे. कोर्टाने सलीम कुत्ताला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर सुप्रीम कोर्टाने 2013 साली ही शिक्षा वैध ठरवली. सलीम कुत्तावर स्फोटात वापरलेले साहित्य पुरवल्याचा आरोप आहे. बॉम्बस्फोटातील महत्त्वाचा आरोपी मोहम्मद डोसा याची मोहम्मद शेथ उर्फ सलीम कुत्ताशी जवळीक आहे.

मोहम्मद डोसा याच्याशी संपर्क ठेवून शस्त्रसाठा पुरवल्याचा आरोप सलीम कुत्तावर आहे. गुजरातमधून हा शस्त्रसाठा जमा करुन तो महाराष्ट्रात आणण्यात आला होता. हाच साठा स्फोटांसाठी वापरला गेला होता. सलीम कुत्तावर रायगडच्या शेखाडी किनाऱ्यावर उतरवलेले RDX पुरवल्याचाबी आरोप आहे. बॉम्बस्फोटासाठी गुजरातमधून शस्त्रसाठा आणण्यात सलीम कुत्ताची भूमिका होती. अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमनसाठी सलीम कुत्ता काम करत होता. टायगर मेमन आणि जावेद चिकनानंच 1993च्या बॉम्बस्फोटाचा कट रचला होता.

सलीम कुत्ता सध्या कुठे?
सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता हा 2016 पासून पुण्यातील येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये आहे. त्याआधी तो नाशिक येथील कारागृहात होता. तिथून तो पॅरोलवर सुटला होता. तो डान्स करत असतानाचा व्हिडीओ तो नाशिक कारागृहातून पॅरोलवर सुटला असतानाचा आहे. येरवडा कारागृहातून तो पॅरोलवर सुटलेला नाही.

सुधाकर बडगुजर यांनी आरोप फेटाळले
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्तासोबत शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक शहर प्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. आजच्या नागपूर अधिवेशनात शिवसेना शिंदे गटाने बडगुजर यांची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी केली होती. यानंतर सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. तसेच माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाले तर मी एसीबी कार्यालयाबाहेर आत्महत्या करेन असा इशारादेखील यावेळी सुधाकर बडगुजर यांनी दिला आहे. असलं नालायक राजकारण करू नये. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि आम्ही मागे हटणार नाही असे म्हणाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bhima Koregaon : भिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिनाचा 14 कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेतून खर्च करावा : राहुल डंबाळे

Solapur News : प्रेमाचा धक्कादायक शेवट ! ‘या’ त्रासाला कंटाळून लग्नाच्याच दिवशी तरुणीने संपवलं आयुष्य

Pune Viral Video : वारकरी पोशाख ,पाठीवर बॅग पुण्यातील ‘त्या’ तरुणांचा वेगळाच स्वॅग; Video व्हायरल

Sudhakar Badgujar : …तर मी आत्महत्या करेन; बडगुजर यांनी दिला इशारा

Ulhasnagar Accident : उल्हासनगरमध्ये कार आणि रिक्षामध्ये भीषण अपघात; 3 जण ठार

Priya Singh : इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर प्रिया सिंहच्या प्रकरणात मोठी अपडेट ! 3 जणांना अटक

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री मदतीसाठी धावले ! जखमी रुग्णाला घेऊन स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये

Actress Tanuja Hospitalised : ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल

Junnar Accident News : कल्याण नगर महामार्गावर तिहेरी अपघात; 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

Weather Update

Weather Update : राज्यात पुन्हा कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला ‘हा’ नवा अलर्ट

Posted by - April 24, 2024 0
मुंबई : हवामान विभागाने (Weather Update) आज महाराष्ट्रात सर्वदूर विजांच्या कडडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. धुळे, नाशिक पालघर वगळता राज्यात…

झुंड सिनेमाबाबत काय म्हणाला अभिनेता रितेश देशमुख…?

Posted by - March 10, 2022 0
झुंड सिनेमाने सर्वांनाच भुरळ घातली आहे. नुकतीच रितेश देशमुखनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं झुंड…

पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील- परिवहन मंत्री अनिल परब

Posted by - April 3, 2022 0
पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर शासनाने इलेक्ट्रिकल वाहन धोरण आणले असून याचाच एक भाग म्हणून समाजात जनजागृती व्हावी यासाठी पर्यायी इंधनावर आधारित…
Firing In Parbhani

Firing In Parbhani : खळबळजनक ! पूर्णा कॉलेज कॅम्पसमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या; परभणी हादरलं

Posted by - December 8, 2023 0
परभणी : परभणीमधून (Firing In Parbhani) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये कॉलेज कॅम्पसमध्ये भर दिवसा गोळीबार करण्यात आला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *