Viral Video

Viral Video : चुकीचं इंजेक्शन देऊन रुग्णालयाबाहेर काढलं अन्… आई-वडिलांसमोर तडफडत मुलीने सोडला जीव

1379 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्याकडे डॉक्टर म्हणजे देवदूत मानला जातो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Viral Video) व्हायरल होत आहे. यामध्ये एका 18 वर्षांच्या मुलीने रुग्णालयाबाहेर तडफडत आपला जीव सोडला आहे. आजारी असल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या 18 वर्षीय मुलीवर चुकीचे उपचार करण्यात आले, यानंतर तिची प्रकृती बिघडली असता उपचार करण्याऐवजी रुग्णालयाने तिला बाहेर काढलं. एखादं सामान सोपवावं तसं रुग्णालयाने मुलीला कुटुंबाकडे सोपवलं. तरुणी रुग्णालयाबाहेर तडफडत मृत पावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओवरून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

18 वर्षीय मुलगी दोन दिवसांपासून रुग्णालयात दाखल होती. दरम्यान, व्हिडीओत मुलगी बाईकवर बेशुद्ध अवस्थेत बसलेली असून आई-वडिलांनी तिला पकडून ठेवल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी यावर कारवाई केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन केलं आहे. आरोपी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी फरार आहेत. दरम्यान, रुग्णालयाला पोलिसांनी सील केलं आहे. मैनपुरीच्या करहल रोडवर असणाऱ्या राधास्वामी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे.

पीडित मुलीला ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कुटुंबाने केलेल्या आरोपानुसार, डॉक्टरांनी तिच्यावर चुकीचे उपचार केले. दोन दिवस रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिची प्रकृती आणखी बिघडू लागली. यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. यानंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी मुलीला रुग्णालयाबाहेर काढलं. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, मुलगी बेशुद्ध अवस्थेत आहे. रुग्णालयातील कर्मचारी तिला बाईकवर बसवून निघून जातात. एक व्यक्ती तिला पकडून उभा असतो. तिथे उभी असणारी महिला धायमोकळून रडताना दिसत आहे. योग्य उपचार न मिळाल्याने अखेर मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. मुलीच्या मृत्यूनंतर मृतदेह तिथेच सोडून रुग्णालयातील सर्व कर्मचारी फरार झाले असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Share This News

Related Post

आम्ही काय मूर्ख आहोत का ? आमदार संजय शिरसाटांची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका

Posted by - March 18, 2023 0
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा 240 जागा तर शिंदेंची शिवसेना 48 जागा लढवेल असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी…
Murlidhar mohol

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : पुण्यातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर

Posted by - June 4, 2024 0
पुणे : पुणे मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या मतदार संघाचे कल यायला सुरुवात झाली आहे. पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर…

युक्रेन येथून जिल्ह्यातील १०२ विद्यार्थी सुखरूप परतले ; जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

Posted by - March 7, 2022 0
युक्रेन देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने भारतातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या १०२ विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यात शासन व प्रशासनाला यश आले…

धक्कादायक : औरंगाबाद मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या ; दोन पानाच्या सुसाईड नोट मधून सांगितले कारण …

Posted by - September 23, 2022 0
औरंगाबाद : औरंगाबाद मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल माधवराव अग्रहारकर यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनिल यांनी…

सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - August 14, 2022 0
मुंबई:- शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन अत्यंत धक्कादायक आणि वेदना देणारे आहे. त्यांच्या निधनाने मराठा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *