Vasai Crime News

Vasai Crime News : खळबळजनक ! ‘त्या’ एका शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून 8 वर्षीय चिमुकलीची हत्या

359 0

वसई : विरारमधून (Vasai Crime News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका 8 वर्षीय चिमुकलीची एका शाळकरी मुलाने हत्या केली आहे. मुलीने चिडवल्याने अल्पवयीन मुलाने तिची गळा आवळून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये आरोपी मुलाच्या वडिलांनीदेखील त्याला साथ दिली. 7 दिवसांनंतर ही धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखेच्या पथकाने जालना येथून तर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी आरोपी बापाला पेल्हार पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मृत मुलीचे नाव चांदणी साह असे होते.1 डिसेंबर पासून चांदणी बेपत्ता होती. सोमवारी तिचा मृतदेह शेजारच्या बंद घरात आढळून आला होता. त्यानंतर अधिक तपासानंतर शेजारी राहणाऱ्या 15 वर्षीय मुलानेची तिची हत्या केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी मुलाचे वडील रामेश्वर कराळे यांना पेल्हार पोलिसांनी अटक केली आहे. तर मुलाला गुन्हे शाखा 2 च्या पथकाने जालना येथून अटक केली आहे. या दोघांनीही आपला गुन्हा कबुल केला आहे.

‘या’ कारणामुळे केली हत्या?
चांदणी आरोपी मुलाला शेंबडा म्हणून चिडवत होती. या चिडवण्याच्या रागातून पंधरा वर्षीय मुलाने तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. अल्पवयीन मुलाने चांदणीला घरात नेऊन गळा दाबून तिची हत्या केली. दोन दिवस चांदनीचा मृतदेह घरातच एका गोणीत लपवून ठेवला होता. त्यानंतर रामेश्वर कराळेने ती गोणी एका मोकळ्या खोलीत आणून टाकली. तपास सुरु असताना पोलिसांना आरोपीच्या घराबाहेर चांदनीची चप्पल सापडली होती. त्यावरून पोलिसांनी मुलाचे वडील रामेश्वर कराळे याला अटक केली. अटकेनंतर आपल्या मुलाने ही हत्या केल्याचे कबुल केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Rupali Chakankar : राष्ट्रवादी कुणाची; रूपाली चाकणकरांनी दिलं ‘हे’ उत्तर

TV Actor Bhupinder Singh : खळबळजनक ! ‘या’ अभिनेत्याचा दिवसाढवळ्या एका कुटुंबावर गोळीबार; 1 जण ठार

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात

Lalit Patil Case : मोठी कारवाई ! ललित पाटील प्रकरणात ‘हे’ दोन पोलीस अधिकारी बडतर्फ

Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची होणार चौकशी; फडणवीसांनी दिले आदेश

Travels on Fire : हज यात्रेला निघालेल्या ट्रॅव्हल्सला तासवडे टोलनाक्याजवळ लागली भीषण आग

Share This News

Related Post

Ajit Pawar

Ajit Pawar : महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून मदत; अजित पवारांची विधिमंडळात घोषणा

Posted by - July 24, 2023 0
मुंबई : महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या भागांमध्ये पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या नुकसानाबद्दल उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित…
Shivajinagar Metro

शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून छत्रपती शिवाजीनगर मेट्रो स्टेशन करावे राष्ट्रवादीची मागणी

Posted by - June 6, 2023 0
पुणे : आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर च्या वतीने पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशनला पुण्यातील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून…

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल के. शंकरनारायण यांचं निधन

Posted by - April 25, 2022 0
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल  के. शंकरनारायण यांचं रविवारी रात्री निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. केरळ  येथील पालघाटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास…
Mumbai Video

Mumbai Video : देव तारी त्याला कोण मारी ! आधी स्कुटीला धडकला, मग रिक्षाच्या चाकाखाली आला चिमुकला

Posted by - October 1, 2023 0
विरार : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कधी चालकाच्या स्वत:च्या चुकीमुळे अपघात (Mumbai Video) घडतात, तर कधी दुसऱ्याच्या चुकांमुळे…

आनंद महिंद्रांनी केलं आदित्य ठाकरेंचं कौतुक

Posted by - April 17, 2022 0
वेगवेगळ्या कल्पनाशक्तींचे कौतुक करणारे उद्योगपती म्हणून महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांची ओळख सर्वश्रुत आहे. उद्योग-व्यवसाय वाढवण्याच्या अनोख्या, डोकेबाज कल्पनांचं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *