Hanjala Adnan

Hanjala Adnan : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनानची अज्ञाताकडून हत्या

490 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कराचीमध्ये मोस्ट वाँटेड असणारा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनान (Hanjala Adnan) याची हत्या करण्यात आली आहे. हंजलाने 2016 मध्ये पम्पोर येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले होते, तर 22 जण जखमी झाले होते. इतकंच नाही तर त्याने 2015 मध्ये जम्मूमधील उधमपूर येथे बीएसफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा तो मास्टरमाइंड होता. या हल्ल्यात 2 जवान शहीद झाले होते, तर 13 जवान जखमी झाले होते.

6 ऑगस्ट 2015 मध्ये NIA कडून त्याच्यावर चार्जशीट दाखल करण्यात आली होती. या दोन्ही हल्ल्यांमध्ये हंजला पाकिस्तानात बसून दहशतवाद्यांना आदेश देत होता. जम्मू काश्मीरच्या श्रीनगर आणि पुलवामा येथे आत्मघाती हल्ले घडवण्यात हंजलाचा हात होता. पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या लष्कर कॅम्पमध्ये भरती झालेल्या नव्या दहशतवाद्यांची दिशाभूल करण्यासाठी हंजलाला पाठवलं जात असे. खासकरुन त्या दहशतवाद्यांशी त्याची भेट घडवली जात असे जे भारतात घुसखोरी करुन दहशतवादी हल्ला करणार होते. अदनानला लष्कर कम्युनिकेशन तज्ज्ञही म्हटलं जात असे.

2-3 डिसेंबरच्या रात्री अज्ञात हल्लेखोरांनी 4 गोळ्या झाडून हंजलाला ठार केलं आहे. कडक सुरक्षा असतानाही हल्लेखोरांनी त्याची हत्या केली. गोळी लागल्यानंतर त्याला पाकिस्तानी लष्कराच्या कराचीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 5 डिसेंबरला त्याचा मृत्यू झाला. हंजला अदनान याची हत्या ही लष्कर-ए-प्रमुख हाफिज सईदसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

RBI : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना केला रद्द

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या

Share This News

Related Post

Flying Kiss

Flying Kiss : राहुल गांधींकडून संसदेत फ्लाईंग किस; भाजप नेत्या स्मृती इराणी यांचा गंभीर आरोप

Posted by - August 9, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल गांधींनी संसदेतुन बाहेर पडताना फ्लाईंग किस (Flying Kiss) दिला असा आरोप भाजप नेत्या स्मृती…
Pune Prashasan

आईचा मृतदेह घेऊन लेक सहा तास फिरला; पुण्यातील धक्कादायक प्रकार आला समोर

Posted by - June 16, 2023 0
पुणे : पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेवरून प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. ही धक्कादायक घटना…
Arshad Madani

Uniform Civil Code : समान नागरी कायद्याला विरोध करणार पण… अर्शद मदनी यांनी स्पष्ट केली भूमिका

Posted by - June 18, 2023 0
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समान नागरी संहितेसंदर्भात अर्थात युनिफॉर्म सिव्हिल कोडसंदर्भात (Uniform Civil Code) पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली…
Dhule Death

देशसेवेचे स्वप्न राहिले अधुरे; NDA तील विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 17, 2023 0
धुळे : धुळे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाचा हाडाखेड तलावात बुडून दुर्दैवी…
Nagpur News

Nagpur News : भाजपतर्फे कामगारांसाठी आयोजित शिबीरामध्ये मोठा गोंधळ

Posted by - March 9, 2024 0
नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भाजपतर्फे बांधकाम कामगारांसाठी आयोजित शिबीरात मोठा गोंधळ झाला.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *