Virar News

Virar News : खळबळजनक ! विरारमध्ये दोघांवर अज्ञातांकडून गोळीबार

558 0

विरार : विरार (Virar News) मधील दोन तरुणावर अज्ञात व्यक्तीने गोळी बार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वज्रेश्वरी अंबाडी वासिम रस्त्यावर शुक्रवार रात्री 9:30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

फिरोज रफिक शेख (वय 27) आणि अजीम अस्लम सय्यद (वय 30) अशी जखमी तरुणांची नावे असून त्यांच्यावर मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी हा लाल कलरच्या सीबीझेड गाडीवरून मास्क बांधून आला होता, आरोपीने सहा राऊंड फायर केले. त्यापैकी तीन गोळ्या दोघांना लागल्या. फिरोजच्या मानेला गोळी लागून आरपार निघाली आहे तर अजीमच्या पोटात आणि पायावर दोन गोळ्या लागल्या आहेत.

जखमी फिरोज आणि अजीम हे विरार पूर्व चंदनसार ईदगा मैदान परिसरतिल राहणारे आहेत. हा गोळीबार कोणी व कोणत्या कारणावरून केला आहे. हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. आरोपींनी घटनास्थवरून पळ काढला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी आरोपी विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

liquor

Pune Ganeshotsav 2023 : तळीरामांसाठी मोठी बातमी ! गणेशोत्सवामुळे ‘या’ दिवशी पुण्यात मद्यविक्री राहणार बंद

Posted by - September 14, 2023 0
पुणे : पुण्यात गणेशोत्सव (Pune Ganeshotsav 2023) मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी 19…
Shinde And Ration

Ration : आता रेशनसाठी दुकानात जाण्याची गरज नाही; शिंदे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - June 18, 2023 0
मुंबई : मंत्रालयात राज्य सरकारच्या (Shinde Government) पार पडलेल्या बैठकीत रेशन (Ration) वाटपाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या…

गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ; पहिल्याच दिवशी तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई

Posted by - February 27, 2022 0
अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाकडून…

शरद पवार यांनी नकार दिल्यास राष्ट्रपतीपदासाठी राजकीय परिघाबाहेरील उमेदवार निवडावा, शिवसेनेची भूमिका

Posted by - June 15, 2022 0
नवी दिल्ली- केंद्रातील सत्ताधारी भाजपाने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली असून सर्व विरोधकांनी राष्ट्रपतीपदासाठी सक्षम उमेदवार ठरवावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *