Satara News

Satara News : पोहायला जाणे बेतले जीवावर! 2 अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

1316 0

सातारा : साताऱ्यामध्ये (Satara News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Satara News) काल 15 ऑगस्टला ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सुट्टी असल्याने बोगदा परिसरातील जानकर कॉलनीच्या परिसरात असलेल्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्वप्नील सुनील मोरे (वय 15) आणि अमोल शंकर जांगळे (वय 16, दोघेही रा. जानकर कॉलनी, बोगदा परिसर, सातारा) अशी मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत. आपल्या तरुण मुलांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दोन्ही तरुणांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

काय घडले नेमके?
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर घरी आलेल्या स्वप्नील मोरे आणि अमोल जांगळे यांना पोहण्याची इच्छा निर्माण झाली. त्यामुळे दोघेही जानकर कॉलनी परिसरात असलेल्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले. दुपारी बाराच्या सुमारास दोघेही पोहण्यास निघून गेले होते. त्यानंतर दुपारी 3 वाजताच्या सुमारास ते बुडाल्याचे समोर आल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली.

या घटनेची माहिती सातारा तालुका पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मेणकर, बीट अंमलदार चव्हाण यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान बंधारा परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्सच्या सदस्यांना या दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

FIRE CALL : कर्वे रास्ता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तळमजल्यावर आगीची घटना PHOTO

Posted by - August 17, 2022 0
पुणे : कर्वे रास्ता नाळ स्टॉप जवळील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तळमजल्यावर आगीची घटना घडली असल्याचे समजते आहे .…

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला ;होणार ‘या’ विषयांवर चर्चा

Posted by - July 13, 2022 0
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी जाणार असल्याचं समजते…

दुसरा श्रावणी सोमवार ! परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिरात आकर्षक फुलांची आरास…(VIDEO)

Posted by - August 8, 2022 0
बीड : आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे. यानिमित्ताने सकाळपासून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीतील वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी…

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत सर्वोच्च न्यायालय निकाल देईल अशी अपेक्षा – अजित पवार

Posted by - July 10, 2022 0
पुणे: राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीचे निवडणूक ओबीसी आरक्षणा विना होणार आहे त्यामुळे ओबीसी समाजाला याचा फटका बसला आहे.…

#ACCIDENT : पिंपरी चिंचवडमध्ये विचित्र अपघात; थरकाप उडवणारं सीसीटीव्ही फुटेज समोर

Posted by - March 11, 2023 0
पिंपरी चिंचवड : सकाळी फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडलेल्या 47 वर्षीय व्यक्तीला एका भरदार कारने जोरदार धडक दिली आहे. या धडकेमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *