drowning hands

Bhiwandi News : तळ्यात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

503 0

भिवंडी : भिवंडीमधून (Bhiwandi News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये मित्रांसोबत तळ्यात पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा तलावाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी उशिरा भिवंडी तालुक्यातील धामणगाव या ठिकाणी ही घटना घडली आहे. मृत मुलांमध्ये एक आठ वर्षांचा मुलगा तर एका बारा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. वसीम मलिक (वय 8 रा. फातिमा नगर) व अंजुम फत्ते मो.रफिक (वय 12 रा.धामणगाव धापशी पाडा) अशी मृत चिमुरड्यांची नावं आहेत.

काय घडले नेमके?
भिवंडी शहरातील फातिमा नगर येथील आठ वर्षांचा वसीम हा तालुक्यातील वडपा धामणगाव धापशीपाडा येथे आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. यावेळी वसीम आपली नातेवाईक असलेली बारा वर्षांची मुलगी अंजुम व इतर दोन साथीदारांसह वडपा धामणगाव येथे साचलेल्या ओव्हळाच्या पाण्यात पोहायला गेला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं ते दोघेही पाण्यात बुडाले.

बाजूला उभ्या असलेल्या दोन साथीदारांनी आरडाओरड केल्यानं तेथून जाणाऱ्या एका वाहन चालकाने मुलांचा आवाज ऐकून पाण्यातून मुलांना बाहेर काढलं. त्यानं तातडीनं या मुलांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्या दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

Latur News

Latur News : भरधाव कारच्या धडकेत ‘या’ माजी नगराध्यक्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - January 9, 2024 0
लातूर : लातूरमधून (Latur News) अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. यामध्ये लातूरच्या माजी नगराध्यक्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला…
Jalgaon News

Jalgaon News : पावसाने केला घात ! सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 27, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. शेतात काम करत असताना…
Crime

रुग्ण हक्क परिषदेच्या उमेश चव्हाणवर खंडणीचा गुन्हा दाखल

Posted by - October 2, 2022 0
तरुणाला ब्लॅकमेल करुन त्याच्या मालमत्तेवर महापालिकेने कारवाई न करण्यासाठी तसेच अ‍ॅट्रोसिटीसारख्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन ६० लाख रुपयांची खंडणी  मागण्याचा…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा समजाला ‘सरसकट’ कुणबी प्रमाणपत्र देण्यास अखिल भारतीय ओबीसी महासंघाकडून विरोध

Posted by - September 10, 2023 0
नागपूर : मराठा समजाला ‘सरसकट’ कुणबी जातीचे प्रमाणपत्र (Maratha Reservation) देण्याला अखिल भारतीय ओबीसी महासंघाकडून विरोध करण्यात आला आहे. शनिवारी…

राज ठाकरे आजपासून पुण्यात ; महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार राज ठाकरे ?

Posted by - March 7, 2022 0
महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *