Train Accident

Train Accident : डबे रुळावरून घसरून दोन मालगाड्यांचा भीषण अपघात; 14 रेल्वे रद्द

660 0

कोलकाता : पश्चिम बंगालमधील (West Bengal) बांकुरा परिसरात आज रेल्वेच्या दोन मालगाड्यांचा भीषण अपघात (Train Accident) झाला. रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरल्यामुळे हा अपघात झाला (Train Accident) आहे. हा अपघात राज्यातील ओडा स्टेशन जवळ घडला. आज पहाटे 4 वाजता हा अपघात झाला.मागून येणाऱ्या माल गाडीने समोर चाललेल्या मालगाडीला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात (Train Accident) झाला आहे. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र एका मालगाडीच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

Dispute : दुचाकीचा धक्का लागल्यानं दोन गटांत तुफान राडा; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

अपघातग्रस्त दोन्ही मालगाडीमध्ये कोणतंही सामान नव्हतं. मात्र त्यांचा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. या अपघातामुळे रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या अपघातामुळे या मार्गावर धावणाऱ्या 14 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत, तर तीन रेल्वे गाडयांचा मार्ग बदलण्यात आला आहे. या मुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

ST Bus Video : पहिल्याच पावसात एसटीला गळती; प्रवाशांनी बसमध्येच छत्री उघडून केला प्रवास

हा अपघात सिग्नलमध्ये आलेल्या काही तांत्रिक अडणीमुळे झाला असल्याची माहिती रेल्वे सुत्रांकडून देण्यात आली आहे. समोर जाणाऱ्या मालगाडीला मागून येणाऱ्या मालगाडीने धडक (Train Accident) दिली. या अपघातामध्ये आठ डबे रेल्वे रुळावरून खाली घसरल्यामुळे हा अपघात झाला. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Share This News

Related Post

समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांच्या विरोधात गुन्हा, काय आहे प्रकरण ?

Posted by - March 2, 2022 0
पुणे – समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्येश्वर मंदिर येथील…
Chhatrapati Sambhajinagar News

Chhatrapati Sambhajinagar News : एका न्यूनगंडातून पोरीने उचलले टोकाचे पाऊल; समोरचे दृश्य पाहून सगळेच हादरले

Posted by - September 7, 2023 0
छत्रपती संभाजीनगर: सध्या तरुण वर्गामध्ये आत्महत्याचे प्रमाण खूप वाढले आहे. कोणत्यातरी विचारातुन किंवा तणावामधून ते टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशीच…
Baramati Accident

Baramati Accident : बारामतीमध्ये भरधाव कारच्या धडकेत 2 शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 4, 2023 0
बारामती : बारामतीमध्ये (Baramati Accident) एका रस्ते अपघाताने दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव कारने धडक दिल्याने त्यांना…
Mahua Moitra

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द; ‘ते’ प्रकरण आले अंगलट

Posted by - December 8, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. संसदेच्या एथिक्स…

अनिल देशमुखांचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढला, 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी

Posted by - April 6, 2022 0
मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुख यांना 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *