Buldhana News

Buldhana News : बहिणीची ‘ती’ भेट ठरली अखेरची ! तीन भावांना एकत्र गमवावा लागला जीव

1060 0

बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये (Buldhana News) नांदुरा येथे दुचाकीने अज्ञात ट्रकला दिलेल्या धडकेने झालेल्या अपघातात दोन सख्खे, तर एक चुलत भावाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना नांदुरा बायपासवरील बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या पुलावर घडली आहे.बहिणीला भेटून परत येत असताना या भावांवर काळाने घाला घातला आहे.

काय घडले नेमके?
मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील कंडारकर कुटुंबीयातील तीन चुलत भावंडे बहिणीच्या भेटीसाठी गेले होते. यानंतर हे तिघेही रात्रीच्या सुमारास आपल्या घरी परतत होते. यादरम्यान मलकापूर खामगाव राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा उड्डाणपुलानजीक ट्रक आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तिघाही भावांची बहिणीसोबतची अपघाता अगोदर झालेली भेट अखेरची ठरली.

उमेश विठ्ठल कंडारकर (वय वर्ष 23), प्रशांत किसन कंडारकर (वय वर्ष 23), नितीन किसन कंडारकर (वय वर्ष 26) सर्व राहणार झोडगा तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा अशी अपघातात मृत पावलेल्या भावांची नावे आहेत. हे तिघेही भाऊ आनोराबाद येथून आंबोला येथे जात असताना एम एच 28 बीएन 2739 क्रमांकाच्या दुचाकीचा अपघात झाला. या आपघातात तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मृत तिघेही अविवाहित होते. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

PUNE CRIME : एकतर्फी प्रेमातून त्याने बनवला ‘खोटा निकाहनामा’ ; मुलीच्या कुटुंबीयांना समजल्यावर घडले असे काही….!

Posted by - July 25, 2022 0
पुणे : पुण्यामध्ये एक विचित्र घटना उघडकीस आली आहे . यामधील दोन आरोपींविरुद्ध 23 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार…
Heavy Rain

Rain Update : मुंबईतल्या पावसानं मोडला जुलै महिन्याचा रेकॉर्ड; 5 दिवसात पडला ‘एवढा’ मिमी पाऊस

Posted by - July 27, 2023 0
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ (Rain Update) घातला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत…

#Mental Health : नैराश्यामुळे उचलले जाते टोकाचे पाऊल; अशी ओळखा लक्षणे, आपल्या जवळच्या माणसाला मानसिक त्रासातून वाचावा

Posted by - March 27, 2023 0
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेहिने वाराणसीतील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर आल्यापासून सर्वांनाच धक्का बसला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *