गणेश विसर्जन मिरवणुक बघण्यासाठी आलेल्या भाविकांचे मोबाईल चोरणाऱ्या मध्यप्रदेश व नाशिक जिल्ह्यातील टोळीपैकी दोन आरोपींना गुन्हयामध्ये अटक

146 0

पुण्यात अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने चाललेली गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 28 तास चालले या विसर्जन मिरवणुकीमध्ये महिला सुरक्षा आणि मोबाईल चोरट्यांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी विविध उपाय योजना राबवल्या होत्या. मात्र तरीही काही चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरल्याच्या घटना पाहायला मिळाल्या मात्र या चोरट्यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे

 

दिनांक १७/०९/२०२४ रोजी गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान भाविकांची गर्दीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला असतो. सदरची मिरवणुक बघण्यासाठी फिर्यादी हर्षल अर्जुन निंबाळकर, रा. येरवाडी, देहु गाव जवळ ता. खेड, जि. पुणे हे त्यांच्या भावासोबत बेलबाग चौक पुणे येथे आले होते दुपारी ०२.०० वा. ते ०२.३० वा.चे दरम्यान शिवाजी रोड बेलबाग चौक बुधवार पेठ पुणे येथील लोखंडी बॅरेकेट जवळील सार्वजनिक रोडवर थांबुन गणेश विसर्जन मिरवणुक पाहत असताना, त्यांचे पॅटचे खिशातील मोबाईल फोन कोणीतरी अज्ञात इसमाने १०,०००/- रु किमंतीचा एम.आय. (रेडमी) कंपीचा मोबाईल फोन चोरुन नेल्याबाबत फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. १८०/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

वरील दाखल गुन्हयाचे गांभीर्य लक्ष्यात घेता फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी प्रशांत भस्मे सर यांनी तपास पथकातील अधिकारी व पोलीस अमंलदार यांना गुन्हा उघडकीस आणणेसाठी मोबाईल चोर ताब्यात घेण्याबाबत महत्वाच्या सुचना दिल्यानंतर पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस अमंलदार गजानन सोनुने, नितीन जाधव यांचे गोपनीय बातमीचे अनुषांगने मध्यप्रदेश तसेच नाशिक जिल्हयातील टोळीपैकी आरोपी नामे १) फैसल अजीज खान वय २२ वर्षे, रा. रमाबाई नगर, मनमाड, जिल्हा नाशिक २) कालु राजु पारधी वय २५ वर्षे, रा. सुहागपुर, जिल्हा ओसंगाबाद, राज्य मध्यप्रदेश अशा ०२ आरोपीतांना तपास पथकातील पोलीस अमंलदारानीं ताब्यात घेवुन त्यांना दाखल गुन्हयामध्ये अटक करुन, पोलीस अटके दरम्यान त्यांचे ताब्यातुन अंदाजे २,७९,०००/- रु चे वेग- मोवाईल फोन हस्तगत करुन, उल्लेखनिय कामगीरी करण्यात आलेली आहे.

 

वेगळ्या कंपनीचे एकुण २१ नग आरोपीतांची चोरी करण्याची कार्यपध्दत यातील अटक आरोपी हे गणेश उत्सव यागर्दीच्या सणामध्ये पुणे येथे येवुन गर्दीमध्ये भाविकांचे खिशातील महागडे मोबाईल फोन चोरी करुन, त्यामधील सिमकार्ड तात्काळ फेकुन देवुन मोबाईल फोन बंद करीत असतात. यातील आरोपीतांना वेळेत अटक केल्यामुळे तसेच पोलीसांचे सतर्कतेमुळे गणेश उत्सव मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात चोरी होण्याचा अनर्थ टाळण्यात फरासखाना पोलीस स्टेशन येथील तपास पथकाला यश आलेले आहे.

 

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त संदिपसिंह गिल, सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग श्रीमती नुतन पवार, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. प्रशांत भस्मे, पो.नि. (गुन्हे) श्री. अजित जाधव, स.पो.नि. वैभव गायकवाड, पो.उप-नि. अरविंद शिंदे, सपोफौ मेहबुब मोकाशी, उत्तम कदम, पोलीस अर्मलदार, तानाजी नागंरे, महेश राठोड, गजानन सोनुने, नितीन जाधव, बाळासाहेब चव्हाण, नितीन तेलंगे, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, विशाल शिंदे, अर्जुन कुडाळकर, समिर माळवदकर, सुमित खुट्टे, संदिप कांबळे, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर, म.पो.अं. रेखा राऊत, यांनी केलेली आहे.

Share This News

Related Post

Ahmednagar News

Ahmednagar News : शिवसेना शिंदे गटाच्या ‘या’ नगरसेवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

Posted by - February 15, 2024 0
अहमदनगर : एका महिन्यात चार गोळीबाराच्या घटना (Ahmednagar News) घडल्याने महाराष्ट्र हादरला होता. अशीच एक गोळीबाराची घटना अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये…
suicide

NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थिनीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - June 14, 2023 0
गोंदिया : आजकाल तरुणाईमध्ये आत्महत्याचे प्रमाण खूप वाढले आहे. एका छोट्याशा अपयशामुळे ते आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. काही…

‘….. नाहीतर तुम्हाला महाग जाईल’, पोलिसांना दम भरणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

Posted by - April 12, 2023 0
गाडीला काळ्या काचा लावून पोलिसांना दमबाजी करणार्‍या तरुणाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. चौकशी केल्यावर तो तोतया पोलीस असल्याचे निष्पन…

नवतरुणांना होतंय तरी काय ? बॉयफ्रेंडचा बर्थडे धुमधडाक्यात सेलिब्रेट करण्यासाठी अल्पवयीन तरुणीने स्वतःच्याच घरातील दागिन्यांवर मारला डल्ला

Posted by - January 12, 2023 0
ठाणे : आज-काल नवतरुण प्रेमात पडतात आणि प्रेमात वाहवातही जातात. अनर्थ तेव्हा होतो जेव्हा या प्रेमाला सिद्ध करण्यासाठी हे नवतरुण…

वाह रे पठ्या ! पुण्याजवळील या गावात शेतकऱ्यांनी केली गव्हाच्या शेतात अफूची लागवड; पोलिसांकडून 11 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Posted by - March 4, 2023 0
पुणे (होळकरवाडी) : पुण्यापासून काही अंतरावर असणाऱ्या होळकरवाडी या गावांमध्ये दोन शेतकऱ्यांनी चक्क गव्हाच्या शेतात अफूची लागवड केल्याचा प्रकार समोर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *