Akola News

Akola News : सगळ्यांना वाटलं चिमुकलीचा आकस्मित मृत्यू झाला; मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येताच सर्वच हादरले!

110670 0

अकोला : अकोला जिल्ह्यातून (Akola News) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये (Akola News) आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नाकाला चिमटा लावून मुलगी झोपल्यामुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा बनाव जन्मदात्या आईने केला मात्र आता वैद्यकीय अहवालात या साडेपाच वर्षीय मुलीच्या हत्येचा उलगडा झाला आहे.या प्रकरणात अकोल्यातील खदान पोलिसांनी मुलीच्या आईला ताब्यात घेतले आहे. अकोला शहरातील बलोदे लेआऊट या ठिकाणी ही घटना घडली आहे. किशोरी रवी आमले (वय 5) असं मृत मुलीचं नाव असून विजया आमले असे आरोपी आईचे नाव आहे. या संदर्भात वडील रवी आमले यांनी दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी आईने आपल्या पोटच्या लेकीची नेमकी कोणत्या कारणामुळे हत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नाकाला चिमटा लावल्याने चिमुकल्या किशोरीचे प्राण गेल्याचा बनाव रचण्यात आला होता. किशोरी नाकाला चिमटा लावून झोपली आणि तिचा मृत्यू झाला असा बनाव किशोरीच्या आईने केला होता. मात्र किशोरीच्या वडिलांनी आईवरच संशय व्यक्त केला होता. त्यांनी पोलिसांना त्याबाबत माहिती दिली होती. आता या प्रकरणात किशोरीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. यात नाकाला चिमटा लावून किशोरीचा मृत्यू झाल्याचा केलेला देखावा समोर आला. तर तिच्या अंगावर आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. जून महिन्याच्या सुरुवातीला किशोरीच्या अकस्मात मृत्यूची नोंद खदान पोलिसांनी घेतली होती. आता किशोरीची आई विजया आमले हिच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आणि तिला ताब्यात घेण्यात आले.

Bangalore : मोबाईल चार्जरची पिन तोंडात घातल्याने 8 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

काय घडलं होतं 2 जून रोजी?
2 जून 2023 रोजी सकाळी 8 वाजता कामावरुन वडील रवी हे घरी जेवणाकरीता आले. किशोरी ही घरी ट्युशनवरून आलेली होती. त्यानंतर किशोरीने सोबत जेवण केले आणि काही वेळ रूममध्ये खेळली . पुन्हा थोड्या वेळाने वडील कामाकरिता घरून दुपारी निघाले. या दरम्यान, पत्नी विजया हिचा फोन आला आणि तिने त्यांना सांगितले की, मी घरातील कामे करीत असताना किशोरी ही पलंगावर खेळता-खेळता झोपली होती, कामे संपल्यावर जेवणासाठी किशोरी हिला झोपेतून उठविले, परंतु किशोरी ही झोपेतून उठत नाही. तुम्ही लवकर घरी या असे म्हणाली. लगेच मित्र वैभव हांडे याला फोन केला अन् रवी आमले घरी गेले. किशोरी हिला शासकीय रुग्णालयात नेले असता येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या संदर्भात रवी आमले यांनी विजया हिच्याकडे विचारपूस केली असता तिने सांगितले की, किशोरी ही पलंगावर ओले कपडे घराबाहेर वाळच घालण्याकरीता असलेल्या चिमट्यानं खेळत होती. कामे झाल्यानंतर घरात पाहिले असता किशोरीने नाकाला चिमटा लावलेला होता आणि किशोरी ही काहीच हालचाल करीत नव्हती, असे तिने सांगितले.हि सर्व घटना घडली तेव्हा तेव्हा किशोरीची आई ही एकटीच घरी होती. त्यामुळे किशोरीच्या वडिलांना तिच्यावर संशय आला. यानंतर किशोरीच्या वडिलांनी आरोपी आईविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक धनंजय सायरे, पीएसआय निता दामधर, पोलीस कर्मचारी करंदीकर व आकाश राठोड यांनी काम पहिले.

Share This News

Related Post

Cabinet Expansion

Cabinet Expansion : अखेर मुहूर्त मिळाला ! ‘या’ दिवशी पार पडणार मंत्रिमंडळाचा विस्तार

Posted by - July 7, 2023 0
मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) रखडला होता. यावरून विरोधकांनी अनेकवेळा टीकादेखील केली…
Jalgaon News

Jalgaon News : दांडियात चॉकलेट वाटप केल्यानंतर तरुणाने घरी येऊन उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल; कुटूंब हादरलं

Posted by - October 22, 2023 0
जळगाव : जळगावमधून (Jalgaon News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या…
Thane

ब्रीजवरून पडलेली सळई गाडीच्या छतातून आरपार; थोडक्यात बचावला ड्रायव्हर (Video)

Posted by - June 5, 2023 0
ठाणे : सध्या मेट्रोची अनेक ठिकाणी कामे सुरु आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडी आणि अशा अनेक संकटांचा सामना…
Ajit Pawar

Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प!

Posted by - February 27, 2024 0
मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय (Maharashtra Budget 2024) अधिवेशन सोमवारपासून (26 फेब्रुवारी) सुरु झालं आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री…
Sanjay Shirsat

Shivsena : ‘सगळी तयारी झालीये, 31 डिसेंबरला…’, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Posted by - November 25, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : ‘31 डिसेंबरपर्यंत सरकार पडणार नाही तर 31 डिसेंबर काहीही घडणार नाही, तुम्ही वाट बघा, पण आमच्याकडे कोण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *