Pune Sadashiv

Pune Crime News : सदाशिव पेठेतील कोयता हल्ल्यात नेमके काय घडलं?

796 0

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. दर्शना पवार हत्याकांडाचं प्रकरण ताज असताना पुण्यातून (Pune Crime News) अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने हल्ला करण्यात आला. एकतर्फी प्रेमातून आरोपी तरुणाने (Pune Crime News) या तरुणीवर हल्ला केला. पुण्यातील (Pune Crime News) सदाशिव पेठ परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही भररस्त्यात एका तरुणीवर निर्घृणपणे रस्त्यात वार करण्यात आले होते. तिथं उपस्थित असलेल्या जमावाने आरोपीला रोखण्याचं धाडस न दाखवल्याने त्या तरुणीचा मृत्यू झाला होता. मात्र आज पुण्यात घडलेल्या घटनेत दोन तरुणांनी जीवावर उदार होत तरुणीचे प्राण वाचवल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी या तरुणांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

काय घडले नेमके?
सदाशिव पेठ भागात आज सकाळी 10 वाजण्यास सुमारास एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले. ही तरुणी आणि एका तरुणासोबत दुचाकीवरून सदाशिव पेठ भागातल्या स्वाद हॉटेलच्या परिसरात आली होती. त्याठिकाणी ते दोघे एकमेकांशी बोलत बोलत असताना आरोपी शंतनू जाधव हा तरुण तिथं आला आणि त्याने बागेतून कोयता काढत दुचाकीवर असणाऱ्या तरुण-तरुणीवर वार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी दुचाकीवरील तरुण आपला जीव वाचवत तिथून पळून गेला आणि शंतनू जाधव याने तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली.

शंतनू जाधव हा हातात कोयता घेऊन तरुणीचा पाठलाग करत होता. एवढ्यात या परिसरात असलेल्या स्थानिक तरुणांनी वेळीच धाव घेत आरोपी शंतनू जाधव याच्या हातून कोयता हिसकावून घेऊन तरुणीचा जीव वाचवला. यानंतर शंतनूला चोप देत पेरू गेट पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करत आहेत.

Share This News

Related Post

Vasant More

मोठी बातमी; वसंत मोरे ‘शिवबंधन’ बांधणार? आज घेणार उद्धव ठाकरेंची भेट

Posted by - July 4, 2024 0
पुण्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली असून पुण्यातील फायर ब्रँड नेते माजी नगरसेवक वसंत मोरे आज राज्याचे माजी मुख्यमंत्री…
Pune Crime

Pune News : कोथुर्णे गावातील ‘त्या’ चिमुकलीला अखेर 20 महिन्यांनी न्याय मिळाला

Posted by - March 23, 2024 0
पुणे : राज्याला हादरवून सोडणार्‍या मावळ तालुक्यातील (Pune News) कोथुर्णे गावात घडलेल्या घटनेतील सहा वर्षांच्या चिमुकलीला अखेर 20 महिन्यांनी न्याय…

बीडमध्ये डोळ्यादेखत कोसळली चार मजली इमारत, वेळीच बाहेर पडल्याने वाचले रहिवाशांचे प्राण (व्हिडिओ)

Posted by - June 8, 2022 0
बीड- बीड शहरात चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या इमारतीमधील रहिवाशांना वेळीच बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ…
shaktikanta Das

RBI चा कर्जदारांना दिलासा; रेपो रेटमध्ये कोणतीही वाढ नाही, गव्हर्नर शक्तिकांत दास यांची घोषणा

Posted by - June 8, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्जदारांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. यामध्ये आरबीआयने रेपो रेटमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *