Thane Crime

Thane Crime : ठाणे हादरलं ! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

33334 0

ठाणे : ठाण्यात (Thane Crime) शुक्रवारी हत्येचा थरार पाहायला मिळाला. रात्री एकाने आपल्या पत्नीवर गोळ्या झाडून तिची हत्या (Thane Crime) केली. यानंतर त्याने देखील स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. ही घटना येथील कळवा येथील कुंभाळआळी येथे घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रमिला साळवी असे गोळी झाडून खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर दिलीप साळवी असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. त्यांनी प्रमिला यांचा खून करून स्वत: देखील आत्महत्या केली आहे.

काय घडले नेमके?
दिलीप साळवी यांनी त्यांच्या यशवंत निवास या ठिकाणी पत्नी प्रमिला हिच्यावर त्यांच्या कडे असलेल्या बंदुकीतून गोळी झाडली. यानंतर त्यांनी देखील स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी हे पाऊल का उचलले या बाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. मात्र, कौटुंबिक वादातून ही घटना घडली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ कळवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सदर घटनेचा तपास सुरू केला आहे. दोघांचेही मृतदेह पोस्टमोर्टमसाठी कळवा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेमागचे नेमके कारण चौकशी केल्यानंतर समोर येईल. दिलीप साळवी हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मिलिंद साळवी यांचे बंधू, तर माजी नगरसेविका अपर्णा साळवी यांचे दीर होते.

Share This News

Related Post

भोसरीतील महावितरणाच्या कनिष्ठ अभियंत्याला 50 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी अटक

Posted by - August 24, 2022 0
भोसरी : भोसरी येथील महावितरणच्या एका कनिष्ठ अभियंत्याला 50 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं तक्रार…

पोलीस भरती 2022 : पोलीस भरती प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत वाढ

Posted by - November 29, 2022 0
मुंबई : पोलीस भरतीत इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना सर्व्हर डाऊन असल्याने राज्यातील अनेक…

‘पुष्पा’ सिनेमाची प्रेरणा घेऊन अडीच कोटींचे रक्तचंदन स्मगल करणारा गजाआड (व्हिडिओ)

Posted by - February 4, 2022 0
मिरज- दक्षिणेतील पुष्‍पा चित्रपटामुळे सध्या देशभर रक्तचंदनाच्या तस्करीचा विषय चर्चेत आहे. या सिनेमाची प्रेरणा घेऊन एका चोरट्याने तब्बल अडीच कोटींच्या…
PMPML

PMPML : PMPMLच्या सतत गैरहजर राहणाऱ्या 36 कर्मचाऱ्यांचं थेट निलंबन

Posted by - July 23, 2023 0
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (PMPML) आपल्या कर्मचार्‍यांच्या वर्तणुकीशी संबंधित समस्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेत थेट 36…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *