dead

सोलापूर हादरलं ! आजीच्या डोळ्यासमोर 10 वर्षांच्या नातवाने सोडला जीव

1503 0

सोलापूर : सोलापूरमध्ये (Solapur) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सोलापूरातील लष्कर विभागात ही दुर्दैवी घटना घडली आहे. शांताराज तिल्लोर (Shantaraj Tillore) असे या घटनेत मृत पावलेल्या नातवाचे नाव आहे. शांताराज तिल्लोर याचा विजेचा शॉक (electric shock) लागून मृत्यू झाला आहे.

काय घडले नेमके?
सोलापूरमध्ये उन्हाळ्यामुळे काही ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. काही ठिकाणी 4 तर काही ठिकाणी 9 दिवसांनी पाणी येत आहे. घटनेच्या दिवशी लष्कर भागात मंगळवारी 9 दिवसांनी पाणी आले होते. त्यामुळे कमी दाबानं पाणी पुरवठा सुरू असल्यानं अनेक जण मोटार लावून घरातील पाणी घेतात. शांताराजच्या घरातही 35 फुटांवर वायर कनेक्शन लावून मोटारीनं पाणी भरण्यात येत होतं. यावेळी शांताराजनं पाणी भरण्यासाठी वायर कनेक्शन लावले, पण तो मेन स्विच बंद करण्याचे विसरला. त्यामुळे त्याला विजेचा जोरदार झटका बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना घडली त्यावेळी शांताराजच्या अपंग आजीच घरी होत्या. त्याचा भाऊ पुणेला गेला होता तर त्याचे आई-वडील मोलमजुरी करत असल्याने ते मोलमजुरीसाठी बाहेर गेले होते. आपल्या डोळ्यादेखत नातू शॉक लागून कोसळल्याचे पाहताच आजीने मोठा आक्रोश केला. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी हा आक्रोश ऐकून घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी शांताराजला छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही त्याअगोदरच त्याचा मृत्यू झाला होता.

Share This News

Related Post

Pune Isis Module

Pune Isis Module : एनआयएचा मोठा निर्णय ! पुणे इसिस मॉड्यूलमधील 4 जणांवर प्रत्येकी 3 लाखांचे बक्षीस

Posted by - September 12, 2023 0
पुणे : पुणे शहरात 18 जुलै रोजी पुणे पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक (Pune Isis Module) केली होती. या दोन्ही दहशतवाद्यांचा…

ऐकावे तेवढे नवलचं ! मॉलच्या चेंजिंग रूममध्ये महिला कपडे बदलताना २ वर्षाच्या बाळाने सोशल मीडियावर सुरु केले लाईव्ह , आणि मग महिलेने …

Posted by - January 11, 2023 0
चीन : चीन मधील एका मॉल मध्ये महिला कपडे बदलत असताना एका २ वर्षाच्या बाळाने सोशल मीडियावर लाईव्ह सुरु केले.…

उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेला अखेर पोलिसांची परवानगी. या अटी शर्तींचे पालन करावे लागणार !

Posted by - June 4, 2022 0
औरंगाबाद- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 8 जून रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला कालपर्यंत परवानगी मिळाली नव्हती.…

Weather Forecast : मेंडोस चक्रीवादळाचा परिणाम झाला कमी; पण अद्यापही राज्याच्या ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा तडाखा

Posted by - December 16, 2022 0
महाराष्ट्र : राज्यात मेंडोस चक्रीवादळाचा परिणाम कमी झाला आहे. पण तरीही राज्यातील वातावरण मात्र कुठे ढगाळ,कुठे पाऊस कुठे, तर कुठे…
Weather Update

Weather Update : पुढील 2 दिवसांत पुण्यात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Posted by - May 14, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसानं (Weather Update) झोडपून काढलं आहे, पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे, दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *