accident

Pune Accident: भरधाव टँकरची दुचाकीला जोरदार धडक; मुलीच्या डोळ्यांदेखत आईने सोडला जीव

639 0

पुणे : पुणे -सोलापूर महामार्गावर आज सकाळी टँकरने दुचाकीला मागून धडक दिल्यामुळे आईचा जागीच मृत्यू (Pune Accident) झाला तर मुलगी गंभीर जखमी आहे. ही घटना (Pune Accident) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. पुणे – सोलापूर महामार्गाच्या जवळ असलेल्या कुंजीरवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीतील आळंदी म्हातोबाची गावाकडे जाणाऱ्या चौकात हा भीषण अपघात घडला आहे.या अपघातामध्ये योगिता राजकुमार गव्हाणे (वय- 35 रा. होले कॉम्प्लेक्स, उरुळी कांचन, ता. हवेली) यांचा जागेवरच मृत्यू झाला तर मृत महिलेची मुलगी सुरेखा राजकुमार गव्हाणे (वय 16) ही अपघातात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कुंजीरवाडी जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Nagpur News : धक्कादायक ! गुड बाय एव्हरीवन, स्टेटस ठेवून 25 वर्षीय जिम ट्रेनर तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

काय घडले नेमके?
योगिता आणि सुरेखा माय लेकी आहेत. नेहमी प्रमाणे आज बुधवारी सकाळी ते दररोज प्रमाणे, योगिता शेवाळेवाडी या ठिकाणी दुचाकीवर कामासाठी निघाल्या होत्या. त्याचवेळी त्यांची मुलगी देखील त्यांच्याबरोबरच निघाली होती. त्या नायगाव चौकात आल्या असतांना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या एका पेट्रोल डिझेलच्या टँकरने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी चालवणाऱ्या योगिता गव्हाणे या रस्त्यावर खाली कोसळल्या. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची मुलगी सुरेखा गंभीर जखमी झाली.

दरम्यान, या अपघाताची (Pune Accident) माहिती मिळताच अपघात ग्रस्तांना कुंजीरवाडीचे पोलीस पाटील मिलिंद कुंजीर ,कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम,आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे पुण्याकडे येणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मुलीच्या डोळ्यांदेखत आईचा जीव गेल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

शनिवार वाड्याजवळील दर्गा कोणाचा? प्रतापगडानंतर आता पुण्यात नवा वाद पेटण्याची शक्यता

Posted by - November 16, 2022 0
पुणे : किल्ले प्रतापगडावर अफजलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवल्यानंतर या ठिकाणी आणखी तीन कबरी असल्याचे निदर्शनास आलं असून आता या कबरी…
video

Video : काळी जादू केल्याच्या संशयावरून जोडप्याला गावकऱ्यांकडून बेदम मारहाण

Posted by - June 20, 2023 0
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ (Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. यामध्ये काही चांगले तर काही धक्कादायक व्हिडिओ असतात. सध्या सोशल…
Ajay Maharaj Baraskar

Ajay Baraskar : जरांगेंवर आरोप करणाऱ्या बारस्करांना मोठा धक्का ! ‘ही’ खळबळजनक माहिती आली समोर

Posted by - February 24, 2024 0
देहू : मागच्या काही दिवसांपासून अजय बारस्कर (Ajay Baraskar) हे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी मनोज…

आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

Posted by - December 13, 2022 0
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *