आत्महत्या की घातपात ? पाण्याच्या टँकर मध्ये आढळला महिलेचा मृतदेह; पुण्यातील हांडेवाडी परिसरात खळबळ

3699 0

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत नाही. पाण्याच्या टँकर मधून पाणी येत नसल्याने टँकरचे झाकण उघडून बघितल्यानंतर टँकर मध्ये चक्क महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना पुण्यातील हांडेवाडी परिसरामध्ये घडली. याच भागात राहणाऱ्या कौशल्या मुकेश चव्हाण (वय २५, रा. दुगड चाळ, जेएसपीएम कॉलेज जवळ, हांडेवाडी) या महिलेचा हा मृतदेह आहे. ही महिला घरातून निघून गेली होती. त्यानंतर तिचा थेट मृतदेह आढळून आला आहे. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

पुरुषोत्तम नरेंद्र ससाणे (वय २७, रा. दुगड चाळ, हांडेवाडी) यांचा पाण्याचा टँकरचा व्यवसाय आहे. बुधवारी दिवसभर विविध भागांमध्ये पाणी पोहोचवल्यानंतर संध्याकाळी ससाणे यांनी टँकर आपल्या घराजवळ पार्क केला होता. त्यानंतर ते आपल्या घरी गेले. गुरुवारी सकाळी पुन्हा नेहमीप्रमाणे त्यांनी टँकर पाणी भरण्यासाठी बाहेर काढला. रामटेकडी येथे त्यात पाणी भरले व टँकर घेऊन ते फुरसूंगी परिसरातील पॉवर हाऊसजवळ असलेल्या एका ठिकाणी पाणी पोचवण्याकरिता गेले. मात्र तिथे पोहोचल्यानंतर पाण्याच्या टाकीत पाणी सोडत असताना पाणी बाहेर येत नव्हते. त्यामुळे पाण्याच्या पाईप मध्ये काही बिघाड झाला असेल असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी सुरुवातील पाण्याचा पाईप तपासला त्यात काहीच आढळून आले नाही म्हणून वॉल्व्ह तपासला. सगळे काही दुरुस्त असूनही पाणी येत नसल्याने त्यांनी पाईप काढून पाहिले असता साडीचे कापड आढळून आले. साडी टँकर मध्ये कशी आली हे पाहण्यासाठी त्यांनी टँकरचे झाकण उघडले असता त्यांना महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ कोंढवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. थोड्याच वेळात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे.

दरम्यान, या महिलेचा मृतदेह टँकरमध्ये आढळून आल्याने हांडेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली. ही महिला नेमकी घरातून का निघून गेली होती ? तिने स्वतः या टँकरमध्ये आत्महत्या केली की खून करून हा मृतदेह टँकरमध्ये टाकण्यात आला, याचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले.

Share This News

Related Post

Shortcut Accident Video

Shortcut Accident Video : शॉर्टकट आला अंगलट ! नागपूर-तुळजापूर महामार्गावर पती – पत्नीचा भीषण अपघात

Posted by - December 3, 2023 0
नागपूर : कधी कधी अनेकदा शॉर्टकट (Shortcut Accident Video) आपल्या अंगलट येतात. याचाच प्रत्यय वर्धा जिल्ह्यातील नागपूर-तुळजापूर महामार्गावरील पवनार परिसरात…

बालभारती ते पौडफाटा रस्ता पर्यावरणपूरक होणार – सिद्धार्थ शिरोळे

Posted by - March 29, 2022 0
पुण्यातील लॉ कॉलेज रोड परीसरातील वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून बालभारती ते पौडफाटा रस्त्यास पुणे महानगरपालिकेची मान्यता मिळाली…

पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रम; जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी घेतला नियोजनाचा आढावा

Posted by - December 15, 2022 0
पुणे : हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी…

आता पुरुषांसाठीही संतती प्रतिबंधक गोळी, तोंडावाटे घेता येणार; वाचा या गोळीचे फायदे

Posted by - February 15, 2023 0
आत्तापर्यंत गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचे केवळ महिलांनाच सेवन करता येत होते. परंतु या गोळ्यांमुळे मासिक धर्मामध्ये समस्या निर्माण होणे ,योग्य…

ग्रामपंचायत निवडणूक काळात एसटी महामंडळ मालामाल; पुणे विभागानं किती कमावलं उत्पन्न ?

Posted by - December 21, 2022 0
पुणे : राज्यात झालेल्या 7751 ग्रामपंचायत निवडणुकीत राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला चांगलाच फायदा झाला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये एसटीला एसटी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *