Suicide News

Suicide News : ‘ही’ दोस्ती तुटायची म्हणत 2 जिवलग मित्रांची ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या

719 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना (Suicide News) समोर आली आहे. यामध्ये दोन जिवलग मित्रांनी धावत्या ट्रेनखाली उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide News) केला आहे. मुकुंदवाडी भागातील रेल्वे रुळावर आज सकाळी (मंगळवारी) या दोघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या आत्महत्येप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Accident News: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

विशाल देविदास दाभाडे (वय -20 वर्ष) आणि अनिल दादाराव आव्हाड (वय 35 वर्ष) अशी आत्महत्या करणाऱ्या दोन तरुणांचे नाव आहे. हे दोघंही चांगले मित्र होते. दोघांनीही सोबतच धावत्या ट्रेनसमोर उडी घेतली. या दोघांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Buldhana News : मित्राची बाईक पळवली अन् घात झाला; तरुणाचा जागीच मृत्यू

मृत दोन्ही तरुण हे मजुरी करायचे. सकाळी स्थानिक कामगार कामावर निघालेले असताना रुळावर त्यांना छिन्नविच्छिन्न अवस्थेत या तरुणांचे मृतदेह (Suicide News) आढळून आले. रात्री बराच वेळ हे दोघंही एकमेकांसोबतच होते अशी माहिती काही लोकांनी दिली आहे. या दोघांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Share This News

Related Post

पुणेकरांनो , तयारीत राहा ! येत्या काही दिवसांमध्ये उन्हाचा तडाका आणखी वाढणार

Posted by - February 24, 2023 0
महाराष्ट्र : अजून मार्च महिना सुरूही झाला नसला तरी तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. आता आगामी पाच दिवस वातावरणातील उष्णता…
Maratha Reservation

Manoj jarange Patil : मराठा वादळ मुंबईत धडकणार ! वाहतुकीपासून ते राहण्यापर्यंत कसे आहे नियोजन ?

Posted by - January 25, 2024 0
मुंबई : मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची पायीदिंडी पुण्यात धडकी भरवल्यानंतर आता मुंबईच्या दिशेने…
Ajit Pawar

Ajit Pawar : प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

Posted by - August 9, 2023 0
पुणे : “ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेला,…

आशावादी बातमी : छत्रपती शिवरायांची ‘जगदंबा तलवार’ महाराष्ट्रात आणणार ? मुनगंटीवार म्हणाले…

Posted by - November 10, 2022 0
महाराष्ट्र : छत्रपती शिवरायांची प्रत्येक आठवण म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराजांच्या कर्तृत्वाचा इतिहास सांगणारी आणखीन एक…

राष्ट्रपती निवडणूक २०२२ : महाराष्ट्रासाठीची मतपेटी स्वीकारुन अधिकाऱ्यांचे पथक मुंबईकडे रवाना

Posted by - July 12, 2022 0
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणूक २०२२ साठी मतपेटी व इतर साहित्यांचे नवी दिल्ली येथील निर्वाचन सदन येथे वाटप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *