Nashik Accident

Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात! धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटून हातात आला अन्…

5727 0

नाशिक : नाशिकच्या (Nashik Accident) नांदगाव भागात हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात (Nashik Accident) 20-25 विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना नांदगावपासून जवळ जामदरी – कळमदरी मार्गांवर घडली आहे. या भीषण अपघातात चालक, वाहक काही प्रवाशांसोबत सुमारे 20 ते 25 विद्यार्थी जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

काय घडले नेमके?
हि बस चालवत असताना अचानक एसटी बसचा स्टेयरिंग रॉड तुटला. त्यामुळे बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. एसटीचा अपघात झाल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मिळेल त्या वाहनाने जखमीना रुग्णालयात आणले. काहींना डोक्याला तर काहींना पायाला मार लागला असून सुदैवाने अपघातात जीवित हानी झाली नाही.

या अपघाताची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची भेट घेऊन विचापूस केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मात्र सुदैवानं कोणतीही मोठी जीवितहानी न झाल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Posted by - April 12, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली आहे. पुण्याच्या नूमवि…

किराणा दुकानात, सुपर मार्केटमध्ये आता मिळणार वाईन ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Posted by - January 28, 2022 0
मुंबई- आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयावर…
Beed Accident

Beed Accident : उच्च शिक्षणाचं स्वप्न राहिलं अधुरं; शिक्षणासाठी कर्ज घेण्यासाठी जात असतानाच तरुणीचा घात

Posted by - September 30, 2023 0
बीड : बीडमधून (Beed Accident) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये आपल्या उच्चशिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज काढण्यासाठी गेलेल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *