Nagpur News

Nagpur News : नागपूर हादरलं ! मोबाईल दिला नाही म्हणून मुलानं आपल्या जन्मदात्या आईला दिली ‘ही’ शिक्षा

1788 0

नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका शुल्लक कारणावरून निर्दयी मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला पण गळ्यावरील जखमांमुळे आरोपीचे बिंग फुटले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. रामनाथ बडबाईक असं आरोपी मुलाचे नाव आहे तर कमलाबाई बडबाईक असे हत्या झालेल्या दुर्दैवी मातेचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली आहे. शवविच्छेदन अहवालात कमलाबाई बडबाईक यांच्या गळ्यावर जखमा आढळून आल्यानं त्यांची हत्या झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

शुल्लक कारणातून केली हत्या
आरोपी मुलाला दारूचे व्यसन होते. तो दारू पिण्यासाठी आपल्या आईकडे सतत पैशांची मागणी करायचा. त्याने दारूचे व्यसन भागविण्यासाठी आईकडे मोबाईलची मागणी केली होती. मात्र आईने मोबाईल देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपीने आपल्या आईची निर्घृणपणे हत्या केली.

Share This News

Related Post

Sai Tamhankar

Sai Tamhankar : सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला 4 अज्ञात व्यक्तींकडून मारहाण

Posted by - August 16, 2023 0
मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिच्या ड्रायव्हरला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्दाम मंडल (वय 32)…
Nashik News

Nashik News : नाशिक हळहळलं ! पोटच्या गोळ्याने आईच्या डोळ्यांदेखत सोडला जीव

Posted by - October 13, 2023 0
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आपल्या मुलास शाळेतून दुचाकीवरून घरी घेऊन…

Devendra Fadnavis : ‘समृद्धी’नंतर मराठवाड्याच्या समृद्धीचा महामार्ग; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Posted by - August 27, 2023 0
परभणी : परभणीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Sharad Mohol

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ हत्येप्रकरणाला मोठं वळण ! पोलिसांना मिळाला ‘हा’ महत्त्वाचा पुरावा

Posted by - February 12, 2024 0
पुणे : कुख्यात गॅगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol Murder) याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत…

संतापजनक : ‘या’ शुल्लक कारणामुळे नातवानेच आजी-आजोबांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून केली क्रूरतेने हत्या; अवघ्या तीन तासात पोलिसांनी असा लावला छडा

Posted by - December 5, 2022 0
नाशिक : नाशिकच्या अभोना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने आजी-आजोबा आणि नातवाच्या नात्याला काळीमा फासली आहे. नातवाने आपल्या आजी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *