Utter Pradesh Crime

जन्मदात्या आईने सुनेची बाजू घेतल्यामुळे मुलाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

464 0

बस्ती : उत्तर प्रदेशमधील (Utter Pradesh) बस्तीमध्ये आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मुलाने आपल्या वृद्ध आईला बांबूने मारहाण केल्यामुळे आईचा मृत्यू झाला आहे. या हत्येमागचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

काय आहे नेमके प्रकरण?
आरोपी मुलाचे नाव बैजनाथ (Baijnath) असे आहे तर मृत आईचे नाव कौशल्या (Kaushalya) असे आहे. आरोपी बैजनाथ याचं रोजच त्याच्या पत्नीसोबत भांडण व्हायचं. यादरम्यान तो अनेकवेळा पत्नीला मारहाणही करायचा. घटनेच्या दिवशीदेखील दोघां पती – पत्नींमध्ये जोरदार भांडण झाले. हे भांडण पाहून 58 वर्षांची आई मध्ये पडली आणि तिने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.

याचा बैजनाथला राग आल्याने त्याने समोरच असलेल्या बांबूने आपल्या जन्मदात्या आईवर हल्ला (Death) केला. या हल्ल्यात मुलाची आई गंभीर जखमी झाली. यानंतर गावकऱ्यांनी आईला रुग्णालयात नेले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Sanjeev Thakur

Sanjeev Thakur : ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई; ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची नेमणूक रद्द

Posted by - November 10, 2023 0
पुणे : पुणे ड्रज माफीया ललित पाटील प्रकरणात चर्चेत आलेले ससूनचे डीन संजीव ठाकूर (Sanjeev Thakur) यांची ससून रुग्णालयातील डीन…
Chandrapur Accsident

भावाच्या अ‍ॅडमिशनसाठी जाताना बहिणीचा वाटेत दुर्दैवी मृत्यू; बापाच्या डोळ्यादेखत सोडला जीव

Posted by - June 18, 2023 0
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये भावाच्या अ‍ॅडमिशनसाठी जाताना बहिणीचा वाटेत मृत्यू झाला आहे. बल्लारपूर…
Pune Crime News

Pune Crime News : धक्कादायक ! पोटच्या मुलीची हत्या करून वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

Posted by - March 19, 2024 0
पुणे : पुण्यातील वाकड परिसरातून (Pune Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आर्थिक विवंचनेतून‎ एका व्यक्तीने पोटच्या…

धक्कादायक : कोयता गॅंग मधील 7 अल्पवयीन मुलांची बाल निरीक्षण गृहात केली होती रवानगी; भिंतीला शिडी लावून असे झाले फरार

Posted by - January 31, 2023 0
पुणे : शहरातील कोयता गॅंग मधील सात अल्पवयीन मुलांची रवानगी येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राच्या बालनिरीक्षणगृहामध्ये करण्यात आली होती.…

भारतीय दूतावासाकडून भारतीय नागरिकांना कीव सोडण्याचे आवाहन

Posted by - March 1, 2022 0
युक्रेन- रशिया आणि युक्रेन युद्ध अजूनही सुरु आहे. युक्रेन आणि रशियाच्या युद्धादरम्यान कीवमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना तातडीने कीव सोडण्याचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *