Solapur News

Solapur News : प्रेमाचा धक्कादायक शेवट ! ‘या’ त्रासाला कंटाळून लग्नाच्याच दिवशी तरुणीने संपवलं आयुष्य

799 0

सोलापूर : सोलापूरमधून (Solapur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेम अनेकदा आपल्याला किती महागात पडू शकते याचा अंदाज या प्रकरणावरून येईल. यामध्ये एका 25 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. सर्वात धक्कादायक म्हणजे तिने आपल्या लग्नाच्याच दिवशी आत्महत्या केली.परिसरातील दोन तरुणांनी या तरुणीचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला, शिवाय तिचे खासगी फोटो परिसरात लिक करु आणि होणाऱ्या नवऱ्याला पाठवून बेअब्रु करु अशी धमकी दिली होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
सालिया शेख असे तरुणीचे नाव आहे, तिने काही दिवसांपूर्वी परिसरातील काही युवक ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप करत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्यासोबत आपली लग्न पत्रिकादेखील जोडली होती. यानंतर तरुणीच्या लग्नाच्या दिवशी येऊन लग्न मोडू आणि तुम्ही काय, कोणीच माझं काही करु शकत नाही, अशी धमकी त्या तरुणानं सालियाला दिली होती.

सालिया शेख हिने युवकांविरोधात 15 ऑगस्ट रोजी तक्रारी अर्ज दिला होता. ज्यामध्ये तिने नमूद केलं होतं की जर सलमान आणि समीर यांनी मला त्रास दिला तर मी आत्महत्या करेन आणि त्यासाठी सर्वस्वी जबाबदार हे दोघेही असतील. यादरम्यान आरोपी तरुणांकडून मृत सालियाच्या होणाऱ्या नवऱ्याला धमकीचे फोन आणि मेसेज पाठवले गेले. तसेच सालियाचे अश्लील फोटो एडिट करून संबधित युवकांनी होणाऱ्या नवऱ्याला पाठवले. यामुळे लग्न मोडल्याच्या धास्तीने तरुणीने स्वत:च्या आयुष्याचा लग्नाच्याच दिवशी शेवट केला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Viral Video : वारकरी पोशाख ,पाठीवर बॅग पुण्यातील ‘त्या’ तरुणांचा वेगळाच स्वॅग; Video व्हायरल

Sudhakar Badgujar : …तर मी आत्महत्या करेन; बडगुजर यांनी दिला इशारा

Ulhasnagar Accident : उल्हासनगरमध्ये कार आणि रिक्षामध्ये भीषण अपघात; 3 जण ठार

Priya Singh : इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर प्रिया सिंहच्या प्रकरणात मोठी अपडेट ! 3 जणांना अटक

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री मदतीसाठी धावले ! जखमी रुग्णाला घेऊन स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये

Actress Tanuja Hospitalised : ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल

Junnar Accident News : कल्याण नगर महामार्गावर तिहेरी अपघात; 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

शिर्डीतील काकड आरतीसाठी भोंग्याची परवानगी द्यावी- मुस्लिम समुदायाची मागणी

Posted by - May 5, 2022 0
शिर्डी- सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत मंदिर किंवा मशिदीवर भोंगे वाजवले जाऊ नये, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…
Reservation Protest

Reservation Protest : बीड हादरलं ! दाम्पत्य आरक्षणाच्या उपोषणातून अचानक उठून घरी गेले; अन्…

Posted by - September 12, 2023 0
बीड : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे (Reservation Protest) पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी आरक्षणाच्या मागणीसाठी एक…
Jalgaon News

Jalgaon News : ड्युटीवरून परतलेल्या वन कर्मचाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

Posted by - October 11, 2023 0
जळगाव : जळगावमधून (Jalgaon News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मुक्ताईनगर येथे वनविभागात कार्यरत असलेल्या वनरक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू…
Neelam Gorhe

Dr. Neelam Gorhe : इर्शाळवाडी ग्रामस्थांचे पुनर्वसन लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करणार – डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - July 22, 2023 0
रायगड : इर्शाळवाडी दुर्घटनेतील मुले, मुली, महिला, पुरुष, एकल स्त्रिया या सर्वांचे सर्व्हेक्षण करून अधिकाऱ्यांनी त्याची व्यवस्थित नोंद ठेवावी असे…
Jalna Muncipality

Jalna Municipality : जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महापालिका; राज्य सरकारची घोषणा

Posted by - May 10, 2023 0
जालना : जालना नगरपालिकेचे (Jalna Municipality) रुपांतर आता महापालिकेत होणार आहे. त्यामुळे जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महापालिका असणार आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *