Solapur News

Solapur News : भावी डॉक्टरने आयुष्याचा केला शेवट ! मित्राची बाईक घेऊन रेल्वे रुळावर पोहोचला अन्…

725 0

सोलापूर : सोलापूरमधून (Solapur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर शहरातील अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्यांने रेल्वे समोर येऊन आत्महत्या केली आहे. सचिन श्रीमंत चौधरी (वय 23 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सचिन चौधरी हा मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील असून सोलापुरातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालय एमबीबीएसचे शिक्षण घेत होता.

सचिन चौधरी हा अतिशय हुशार विद्यार्थी होता. सचिनचे वडील श्रीमंत चौधरी छत्रपती संभाजीनगर येथे शेती करतात. घरात सचिन हा मोठा मुलगा होता. बारावीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर लाखो रुपये फी भरून कुटुंबीयांनी सचिनला अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर येथे दाखल केले होते. सचिन हा घरात पहिलाच डॉक्टर होणार होता. प्रथम वर्षांत सुद्धा सचिनने चांगले गुण घेतले होते. वर्गात सर्वांशी हसतखेळत राहत होता. हॉस्टेलमध्ये देखील सचिनचा स्वभाव उत्तम होता.रविवारी सकाळी त्याने मित्राची बाईक घेतली आणि शहरा जवळ असलेल्या होटगी गावा जवळ जाऊन त्याने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला.

सचिन चौधरी याने असे का केले? किंवा आत्महत्या का केली? हे अद्याप समजू शकलेले नाही. सचिनने आत्महत्या केल्याची वार्ता ऐकताच त्याच्या मित्रांना जबर धक्का बसला आहे. वळसंग पोलिसांनी पंचनामा करुन दोन तुकडे झालेला सचिनचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवला होता. सचिनच्या वर्ग मित्रांनी दुःख व्यक्त करत शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे सचिनच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

National Constitution Day : 26 नोव्हेंबरलाच का साजरा करतात संविधान दिवस?

Delhi Crime : देश हादरला ! 350 रुपयांसाठी तरुणाची 60 वेळा चाकू भोसकून हत्या

Shivsena : ‘सगळी तयारी झालीये, 31 डिसेंबरला…’, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा

Zero Balance Account : खात्यात पैसे नाहीत? नो टेन्शन आता झिरो बॅलन्स असतानाही बँक देणार पैसे

Share This News

Related Post

पुण्यात १३ वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, शाळेच्या बाथरूममध्ये केले घृणास्पद कृत्य

Posted by - March 24, 2022 0
पुणे- पुण्यात एका १३ वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओळख असल्याचा बहाणा करून एका अज्ञात व्यक्तीने…
Video

Ajit Pawar : अजितदादांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्यांनी घातला गोंधळ

Posted by - November 20, 2023 0
भंडारा : भंडारा जिल्ह्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी…

TOP NEWS SPECIAL: महाराष्ट्र केसरी किताबाचे आतापर्यंतचे ‘हे’ आहेत मानकरी ?

Posted by - January 15, 2023 0
राज्यात नुकतीच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली यात खेडच्या शिवराज राक्षे 2023 चा महाराष्ट्र केसरी किताब जिंकला सध्या त्याचा…
Advay Hire

Advay Hire : ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना अटक; कोण आहेत अद्वय हिरे?

Posted by - November 16, 2023 0
नाशिक : सध्या नाशिक जिल्ह्यात जिल्हा बँक फसवणूक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे. या प्रकरणी आता एक मोठी अपडेट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *