Solapur News

Solapur News : शाळेजवळ सिमेंटचा बल्कर पलटी झाल्याने एका चिमुकलीसह 4 जणांचा चेंगरून मृत्यू

3277 0

सोलापूर : सोलापूरमधून (Solapur News) अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Solapur News) एका चिमुकलीसह 4 जणांचा चेंगरून मृत्यू झाला आहे. सोलापूर शहराजवळील होटगी गावाजवळ असलेल्या औज गावा जवळ शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सिमेंटचा बल्कर पलटी होऊन हा अपघात झाला.

काय घडले नेमके?
या अपघातात प्रज्ञा बसवराज दोडतले (इयत्ता 3 री,रा औज), विठ्ठल शिंगाडे (वय 70 वर्ष,रा औज ता दक्षिण सोलापूर) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अन्य दोघांची बाहेरगावचे असून त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. या अपघाताची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, वळसंग पोलीस ठाण्याचे एपीआय सनगले,अतुल भोसले,आरटीओ अधिकारी गवारे हे आपल्या फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या अपघातानंतर औज येथील ग्रामस्थांनी एकच गोंधळ सुरू केला आहे. औज गावाच्या पूढे चेट्टीनाड व झुअरी सिमेंटच्या कंपन्या आहेत. सिमेंटच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. यापूर्वी गावातील एका इसमाचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडे तक्रार करून देखील ही वाहतूक बंद केली नाही. यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. त्यांनी मृतदेहाची रुग्ण वाहिका अडवून धरल्यामुळे घटनास्थळी थोडी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

Share This News

Related Post

चांगले काम करा ; महाविकास आघाडीचे सरकार तुमच्यासोबत – अजित पवार

Posted by - April 20, 2022 0
कोल्हापूर उत्तरच्या नवनिर्वाचित आमदार जयश्रीताई जाधव यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. जनतेने तुमच्यावर मोठा…
uday samant

निकाल विरोधात गेल्यास शिंदे गटाचा प्लॅन बी रेडी? उदय सामंत यांचा मोठा गौप्यस्फोट

Posted by - May 11, 2023 0
मुंबई : मागच्या अनेक दिवसांपासून राज्याचा राजकारणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. आज सुप्रीम (Supreme Court) निकाल येणार आहे. काही…
Maratha Reservation

Maratha Reservation : जालन्याच्या तरूणाने मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - October 19, 2023 0
मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत एका आंदोलकानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनिल बाबुराव कावळे असं या आत्महत्या…
Solapur News

Solapur News : सोलापूर हादरलं ! बायकोला विहिरीत ढकलून स्वतःदेखील केली आत्महत्या

Posted by - July 15, 2023 0
सोलापूर : सोलापूरमध्ये (Solapur News) पती- पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये पती-पत्नीच्या वाद विकोपाला गेल्याने पतीने अगोदर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *