Solapur News

Solapur News : खळबळजनक ! कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या PSI ला अटक

508 0

सोलापूर : सोलापूर पोलीस दलातून (Solapur News) एक खळबळजनक बातमी आली आहे. यामध्ये सोलापूर शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षकांच्या संमतीने दोन लाखांची लाचेची मागणी करत एक लाख रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी पोलीस उपनिरीक्षकाने दर्शवली होती. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
एका व्यक्तीवर ॲट्रॉसिटी आणि इतर गुन्हे दाखल असताना त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तक्रारदार आणि त्यांच्या मित्राकडून लाचेची मागणी पोलीस उपनिरीक्ष विक्रम राजपूत यांनी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने याविषयी तक्रार दाखल केली होती. त्यांनतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत विक्रम राजपूत यांना अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध दोन महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास विक्रम राजपूत करत होते. त्या व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी राजपूत यांनी स्वतःसाठी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या नावाने दोन लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार संबंधित व्यक्तीच्या मित्राने केली होती. त्यानंतर एसीबीने 6 ऑक्टोबर रोजी या तक्रारीची पडताळणी केली तेव्हा राजपूत यांनी एक लाख रुपयांची लाच स्विकारण्यास संमती दर्शवली होती. त्यानंतर एसीबीने सापळा रचून राजपूत यांना अटक केली आहे. या घटनेमुळे सोलापूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द; ‘हे’ कारण आले समोर

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला ऑरेंज अलर्ट

Palghar News : धक्कादायक! क्रिकेट सामना बघताना वाद झाला अन् तरुण जीवानिशी मुकला

Share This News

Related Post

एनडीएच्या परीक्षेत हजार मुली उत्तीर्ण

Posted by - March 3, 2022 0
लष्कराच्या तिन्ही दलांना दर्जेदार अधिकारी पुरविणाऱ्या पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या प्रवेश प्रक्रिये अंतर्गत(एनडीए) सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती मार्च – एप्रिल…
Crime

रुग्ण हक्क परिषदेच्या उमेश चव्हाणवर खंडणीचा गुन्हा दाखल

Posted by - October 2, 2022 0
तरुणाला ब्लॅकमेल करुन त्याच्या मालमत्तेवर महापालिकेने कारवाई न करण्यासाठी तसेच अ‍ॅट्रोसिटीसारख्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन ६० लाख रुपयांची खंडणी  मागण्याचा…
Moon Mission

Moon Mission : 70 वर्षात 111 वेळा प्रयत्न फक्त 8 मोहिमा यशस्वी; जाणून घ्या जगभरातील चंद्रमोहिमांचा आतापर्यंतचा प्रवास?

Posted by - August 22, 2023 0
मुंबई : ज्या क्षणाची प्रत्येक भारतीय वाट पाहतोय, तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी…

TOP NEWS INFO : 11 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणारा समृद्धी महामार्ग आहे तर कसा ?

Posted by - December 5, 2022 0
11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या समृद्धी महामार्गाची नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Pune Crime News

Pune Crime News : पुण्यात तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने भीषण हल्ला; Video आला समोर

Posted by - June 27, 2023 0
पुणे : दर्शना पवार हत्याकांडाचं प्रकरण ताज असताना पुण्यातून (Pune Crime News) अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *