Solapur Accident

Soalpur Accident: बाळूमामांच्या दर्शनाहून परतताना दुर्दैवी अपघातात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

754 0

सोलापूर : राज्यात अपघाताचे (Soalpur Accident) प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. सांगोला तालुक्यातील आदमापूर येथील मंदिरातून बाळूमामांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. यामध्ये दुचाकी दुभाजकावर आदळून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. अपघातात (Soalpur Accident) मृत झालेले दोघेजण सोलापूर शहरातील आहेत. विशाल लक्ष्मण कटाप (वय 26, रा. स्वामी विवेकानंदनगर, हत्तुरे वस्ती, सोलापूर) आणि बसवराज धानाप्पा गौडरू (वय 29, रा. नई जिंदगी, सिद्धेश्वरनगर, सोलापूर) अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीची नावे आहेत.

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

काय घडले नेमके?
रविवारी सायंकाळी 5.15 च्या सुमारास मिरज-सांगोला महामार्गावर काळूबाळूवाडी पुलावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात विशाल कटाप,बसवराज गौडरू,शांतेश्वर सूर्यकांत शिरोळे हे तिघंजणं दुचाकीवर ट्रिपल सीट बसून सोलापूरकडे येत असताना त्यांचा वाटेतच भीषण अपघात झाला. ते बाळूमामांच्या दर्शनासाठी निघाले होते. तर सागर विठ्ठल पवार व दीपक सूर्यकांत शिरोळे असे दोघे जण (एम एच 13 बी.एस. 8356) या दुचाकीने शनिवारी रात्री 12 च्या सुमारास सोलापूर येथून आदमापूरला निघाले होते.अमावास्येनिमित्त श्रीक्षेत्र आदमापूर येथील बाळूमामाचे दर्शन घेतले. रविवारी देवदर्शन आटोपून दुपारी 12च्या सुमारास हे 5 जण परत त्याच दोन दुचाकींवरून सोलापूरच्या दिशेने येत होते.

बाईक अन् कारच्या अपघातात बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू

यावेळी विशाल, बसवराज, शांतेश्वर हे तिघेजण एका दुचाकीवर बसले होते. ते ट्रिपलसीट मिरजमार्गे सांगोल्याच्या दिशेने निघाले होते. रविवारी सायं 5.15 च्या सुमारास त्यांची दुचाकी जुनोनी जवळ काळूबाळूवाडी पुलाच्या दुभाजकाला वेगात आदळली. हा अपघात एवढा भीषण होता कि, दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दीपक सूर्यकांत शिरोळे यांनी या अपघाताप्रकरणी (Soalpur Accident) फिर्याद दाखल केली आहे.

Share This News

Related Post

मोठी बातमी! राहुल नार्वेकर विधानसभेचे नवे अध्यक्ष

Posted by - July 3, 2022 0
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर भाजपा व शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. भाजपा व शिंदे गटाच्या एकूण…
Weather Forecast

देशातील काही राज्यात पाऊस तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी !

Posted by - January 4, 2024 0
सध्या पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये कडाक्याची थंडी कायमच आहे. IMD नुसार पंजाब आणि हरियाणासह चार राज्यांमध्ये थंडीचे दिवस…
Bhagirath Bhalke

Bhagirath Bhalke : राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके BRS पक्षात करणार प्रवेश?

Posted by - June 25, 2023 0
पंढरपूर : मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादीचे नेते, दिवंगत माजी आमदार भारत भालके (Bhagirath Bhalke) यांचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) …

BREAKING : शिंदे गटाची ‘बाळासाहेबांची शिवसेना’, तर उद्धव ठाकरेंना मिळालं पक्षासाठी ‘हे’ नाव ; वाचा सविस्तर

Posted by - October 10, 2022 0
मुंबई : आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळाल आहे. तर उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब…

गुणरत्न सदावर्ते यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी, छत्रपती घराण्यावरील टीका भोवली

Posted by - April 15, 2022 0
सातारा- साताऱ्यातील छत्रपती घराण्यावर टीका केल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *