Mumbai News

Mumbai News : पुणे, नागपूरनंतर आता मुंबईमध्ये हिट अँड रनची घटना; प्रकरण दाबण्याचा प्रयत्न?

445 0

मुंबई : पुण्यात अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोघांना चिरडलं होतं. हि घटना ताजी असताना (Mumbai News) नागपुरमधील महाल भागातील झेंडा चौकात शुक्रवारी रात्री मद्यधुंद कारचालकाने बेदरकारपणे गाडी चालवत तिघांना उडवले होते. यानंतर आता मुंबईमधून हिट अँड रनची केस समोर आली आहे. सायन हॉस्पिटलच्या आवारात एका डॉक्टरने भरधाव कार एका रुग्णाच्या अंगावर चढवली. या अपघातात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. शनिवारी पोलिसांनी याप्रकरणाची माहिती दिली.

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न?
मुंबईतील लोकमान्य टिळक म्यूनसिपल रुग्णालय (सायन रुग्णालय) परिसरात शुक्रवारी रात्री हा अपघात घडला. अपघातात रूग्णाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. फॅारेन्सिक विभागात काम करणाऱ्या या डॅाक्टरवर हॅास्पिटलच्या डिनने कारवाई ऐवजी संपुर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी हॅास्पिटलच्या आवारात रस्त्यावर पडलेल्या रूग्णाला गाडी पार्किंगमधुन बाहेर काढताना डॅाक्टराच्या गाडीने चिरडले. रूग्णांची बॅाडी शवविच्छेदनासाठी जे जे रूग्णालयात पाठवण्यात आली आहे.

रुबेदा शेख (वय 60, रा. मुंब्रा कौसा) यांच्यावर सायन रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. 16 तारखेला त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा त्या ड्रेसिंग करण्यासाठी रुग्णालयात आल्या होत्या. ड्रेसिंग करून रुग्णालयाच्या गेट क्रमांक 7 नजीकच्या परिसरात त्या झोपल्या होत्या. संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास डॉ. डेरे यांची गाडी तेथून जात असताना जुबेदा यांच्या अंगावर चढली. हा प्रकार कळताच जुबेदा यांना तत्काळ अपघात विभागात नेण्यात आले; पण त्या बेशुद्ध पडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच रुबेदा यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. शनिवारी दुपारी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सायन पोलिसांनी गाडी चालक डॉ. डेरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

पुणे अपघात प्रकरण : पबवर सरसकट कारवाई का? व्यावसायिक, वेटर्स, बाउन्सर्स, सप्लायर्सने घरं कशी चालवायची?; हॉटेल असोसिएशनने उपस्थित केले सवाल

Weather Update : महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा; हवामान खात्याने वर्तवला धडकी भरवणारा अंदाज

Pune News : पुण्यातील आणखी एका पबवर छापा; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Sucess Story : स्पर्धा परीक्षेत अपयश आले मात्र तो खचला नाही… आता करतोय लाखोंची कमाई

KKR vs SRH : …तर एकही बॉल न खेळता KKR ला मिळणार आयपीएलची ट्रॉफी

KKR vs SRH : IPL Final मध्ये कसे असेल हवामान? कोणत्या संघाचे पारडे राहणार जड?

IPL Final : IPL फायनलमध्ये ‘या’ 5 खेळाडूंच्या कामगिरीवर असणार सगळ्यांचे लक्ष

Pune Porsche Car Accident : पुणे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ‘ते’ CCTV फुटेज लागले पोलिसांच्या हाती

Sanjay Raut : गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी प्रयत्न केले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Buldhana Accident : शिर्डीवरून परतणाऱ्या भाविकांच्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात

Baby Care Center : दिल्ली हादरली ! बेबी केअर सेंटरला लागली भीषण आग; 7 नवजात बाळांचा मृत्यू

Cyclone Update : काही तासांमध्ये ताशी 110 ते 120 किमी वेगानं चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्राबाबत IMD ने दिला ‘हा’ इशारा

Share This News

Related Post

Crime News

Crime News : शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील काका पुतण्याची हत्या

Posted by - July 28, 2023 0
धुळे : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मलगाव शिवारातील पिपल्यापाडा येथे शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील दोन गटात तुफान हाणामारी (Crime News)…
Beed News

Maratha Reservation : बीडमध्ये मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादीचं पक्ष कार्यालय पेटवलं

Posted by - October 30, 2023 0
बीड : सध्या मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातील राजकारण पेटले आहे. मराठा समाजाकडून आता उद्रेक पाहायला मिळत आहे. माजलगावमध्ये ठिकठिकाणी…

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर राज्याच्या गृह खात्यावर नाराज, कारण….

Posted by - March 31, 2023 0
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राज्याच्या गृह खात्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. महिला प्रतिनिधीला स्वतःवरती झालेल्या अन्यायाला वाचा…

कांडका पडला! राजाराम सहकारी साखर कारखान्यात महाडिक गटाची दमदार एन्ट्री

Posted by - April 25, 2023 0
कोल्हापूर: छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक विजयी झाले आहेत. त्यांनी विरोधी सतेज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *