Sindhudurga News

Sindhudurg News : कुटुंबावर दु:खाचा डोंगर ! सकाळी पाणी सोडायला गेला; अन्..

383 0

सिंधुदुर्ग : आज महाराष्ट्रात सगळीकडे गणपतीचा सण साजरा केला जात आहे. यादरम्यान सिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील चौके-गोड्याचीवाडी येथील व्यावसायिक राजकमल वामन गावडे (36) या युवकावर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर काळाने घाला घातला आहे. घरापासून काही अंतरावर असलेल्या पंपाच्या थ्री फेज वायरची दुरुस्ती करण्यासाठी गेला असता त्याला वीजेचा शॉक लागला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सगळीकडे शोककळा पसरली आहे.

राजकमल वामन गावडे हा घटनेच्या वेळी सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास चहापाणी करुन घरापासून काहीशा अंतरावर असलेल्या वराहपालन शेडमध्ये पाणी सोडायला गेला. मात्र पंपाने पाणी येत नसल्याने शेडच्या मागे पंपाच्या तुटलेल्या वायरला जोडताना त्याला विजेचा धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुपारपर्यंत राजकमल घरी न आल्याने त्याच्या फोनवर पत्नीचे वारंवार फोन केले. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर पत्नीने शेतावर जाऊन शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली.

यानंतर गावच्या पोलीस पाटलांनी याची माहिती पोलिसांना दिली. मालवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल जाधव, सुभाष शिवगण, अजय येरम, डी. व्ही. जानकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

Ajit Pawar

Ajit Pawar : मोदी सरकारच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - September 1, 2023 0
मुंबई : केंद्र सरकारने अचानक संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. यानंतर देशात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ यावर एक समिती गठित…

साखर उद्योगातील योग्य नियोजन गरजेचे – नितीन गडकरी (व्हिडीओ)

Posted by - June 4, 2022 0
पुणे- साखर उद्योग हा महाराष्ट्राचा मुख्य उद्योग आहे. या उद्योगातील क्षमता लक्षात घेऊन पुढील नियोजन करणे गरजेचे आहे. इथेनॉलचे महत्व…
Akola News

Akola News : बहिणीसाठी कायपण ! परीक्षेला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ बनला तोतया पोलीस; मात्र ‘ती’ चूक पडली महागात

Posted by - February 22, 2024 0
अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून (Akola News ) सुरुवात…

सिल्वर ओकवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड कोण, याचा पोलीस शोध घेणार- अजित पवार

Posted by - April 9, 2022 0
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या मुंबईमधील घरावर संपकरी एसटी कामगारांनी प्रचंड गोंधळ घातला. या कामगारांनी चप्पलफेक देखील केली.…

‘नमो शेतकरी महासन्मान’ : शेतकऱ्यांना मिळणार 6000 रुपये, नेमकं काय म्हणाले अर्थमंत्री , वाचा सविस्तर

Posted by - March 9, 2023 0
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करण्याला सुरुवात केली असून शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतुद करण्यात अली असल्याचे सांगितलं आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *