Shrirampur News

Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

664 0

श्रीरामपूर : श्रीरामपूरमधून (Shrirampur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका एजंटने RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेमुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली. या सगळ्या प्रकाराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या प्रकारामुळे श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात एजंट लोकांची मुजोरी पहायला मिळाली.

काय आहे नेमका प्रकार?
कागदपत्रावर सही केली नाही म्हणून थेट एका एजंटने कर्मचाऱ्यावर हल्ला केला. कर्मचाऱ्याला मारहाण करत चॉपरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना काल दुपारी श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात घडली. 23 नोव्हेंबरच्या दुपारी, श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात कामकाज सुरू असताना, आरटीओ कार्यालयात दुपारी 1.30 ते 2 वाजेच्या दरम्यान, एजंटगिरी करणाऱ्या हुजेफ यूनुस जमादार यानं वाहनावरील बोजा कमी करत, वाहन हस्तांतरन करण्याचं काम करून दे, असं म्हणत आरटीओ कार्यालयात, कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या सुनील जगन्नाथ शेवरे यांना, मी कोण आहे तुला माहीत नाही थांब तुला दाखवतो, म्हणत अरेरावी व शिवीगाळ केला. धारदार लोखंडी हत्यार व 14 ते 15 विशिष्ट समाजाच्या लोकांसोबत,आरटीओ कार्यालयातील केबिन मध्ये घुसून त्यांना चाकूचा धाक दाखवून आरटीओ कार्यालयातील कर्मचा-यास मारहाण केली.

या संदर्भात आरटीओ कार्यालयात, कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या सुनील जगन्नाथ शेवरे यांच्या फिर्यादीवरून, श्रीरामपूर पोलीस ठाण्यात भादवी कलम 353, 332, 183, 34, अनुसूचित जाती आणि जमाती ३(1), (r) (s) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तात्काळ, गुन्ह्यातील मुख्य आरोपी हुजेफ यूनुस जमादार याला ताब्यात घेतले आहे. श्रीरामपूर शहर पोलीस बाकी आरोपींचा शोध घेत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Deepfake Technology : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले डीपफेक तंत्रज्ञान नेमके काय आहे?

IRCTC ची वेबसाईट ठप्प; तिकीट बुकिंग करताना येत आहेत अडचणी

KBC 15 : एक चुक पडली 97 लाखांना! विराटचा ‘विराट’ विक्रम थोडक्यात हुकला

Accident News : दुभाजकाला धडकून कारचा भीषण अपघात

Milk : दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?

Kolhapur Accident : गोव्याहून मुंबईला येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा कोल्हापुरात भीषण अपघात

Share This News

Related Post

Jammu and Kashmir

Jammu and Kashmir: उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 2 दशतवाद्यांना कंठस्थान

Posted by - April 5, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सार्वत्रिक निवडणुकांचे वातावरण असताना जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 2…
Kolhapur News

Kolhapur News : कोल्हापूरमधील युवक ‘ते’ कृत्य करून फसला; अन् आपला डोळा गमावून बसला

Posted by - September 30, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत लोखंडी नळामध्ये लावलेला सुतळी बॉम्ब उडत…
Kolhapur News

Kolhapur News : के आय टी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडून मतदार जनजागृती विषयी पथनाट्य सादर

Posted by - February 29, 2024 0
कोल्हापूर : मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत के आय टी अभियांत्रिकी महाविद्यालयातील (Kolhapur News) रा से यो च्या स्वयंसेवकांनी शिवाजी विद्यापीठामध्ये ‘मतदार…
Ajit And Sharad Pawar

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: काका आता तरी थांबा VS अरे मी काय म्हातारा झालोय का; पुतण्याच्या लढाईत कोण जिंकणार ?

Posted by - July 6, 2023 0
मुंबई : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर नुकत्याच अजित पवार गट आणि शरद पवारांच्या गटाकडून बैठका घेत शक्तिप्रदर्शन करण्यात करण्यात (TOP…
Ravindra Shobhane

Sahitya Sammelan : अमळनेर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड

Posted by - June 25, 2023 0
पुणे : 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Sahitya Sammelan) अमळनेर या ठिकाणी पार पडणार आहे. या संमेलनाच्या (Sahitya…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *