Akola Crime

Akola Crime : अकोल्यातील ‘त्या’ 19 वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

1332 0

अकोला : अकोला जिल्ह्यात (Akola Crime) 19 वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत तरुणी काजल (बदलेलं नाव) हिच्यावर हत्येच्या (Akola Crime) अगोदर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालात समोर आलं आहे. त्यानुसार या प्रकरणातील आरोपीविरोधातील कलमांमध्ये वाढ करून त्यामध्ये 302 सह 376, 377 कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. काजल ही 27 जुलैपासून बेपत्ता होती आणि 29 जुलै रोजी तिचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

नेमकं काय होतं प्रकरण?
काजल ही 27 जुलै रोजी रात्री शौचालयास जाते म्हणून घरातून निघून गेली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. अखेर कुटुंबीयांनी ती बेपत्ता असलेली तक्रार पातुर पोलिसात दाखल केली. पातुर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. परंतु 29 जुलै रोजी पातूर येथील सुमित्राबाई अंधारे कृषी विद्यालयाजवळील शेत शिवारात जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका काटेरी झुडपात काजलचा मृतदेह आढळून आला. काजलचा हात आणि गळा ओढणीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. आधी गळा आवळला आणि नंतर तिचे हात बांधून ठेवले, असं प्राथिमक वैद्यकीय अहवालात समोर आलं होतं.

या घटनेमुळे (Akola Crime) जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. ठिकठिकाणी सामाजिक संघटनांकडून निषेध व्यक्त केला जात होता. तपासादरम्यान पातुर पोलिसांना गावातीलच गजानन बळकर याचे काजलच्या कुटुंबीयांसोबत वाद असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. हे प्रकरण एवढे चिघळले कि याचे परिणाम विधानभवनात उमटले होते.

आमदार अमोल मिटकरींचा आरोप
तरुणी बेपत्ता असताना पोलिसांकडून कुटुंबियांना सहकार्य मिळालं नाही, याअगोदर तीन वेळा आरोपीविरुद्ध तक्रार करूनही पोलिसांनी गांभीर्यांनं दखल घेतली नाही, त्यामुळे पोलिसांच्या हलगर्जीपणानं काजलचा बळी गेला, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केला होता.

Share This News

Related Post

aditya-L1

Aditya L1 : ISRO नं रचला इतिहास ! सूर्याजवळ पोहोचला भारताचा ‘आदित्य L1’

Posted by - January 6, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भारताने इतिहास (Aditya L1) रचला आहे. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर भारताने सूर्य…
Shocking Video

Shocking Video : केरळमध्ये सुनेनी केली सासूला बेदम मारहाण; मुलगा मात्र…

Posted by - December 16, 2023 0
आजकाल प्रत्येक घरात सासू-सुनेचे किस्से ऐकायला (Shocking Video) मिळतात. यामध्ये काही किस्से चांगले तर काही संतापजनक असतात. सासू – आणि…
Crime

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटला; पोलिसांनी सापळा लावला आणि अखेर…..

Posted by - March 28, 2023 0
शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला शिरुर पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यासाठी नेले असताना पोलिसाच्या हाताला हिसका…
Mumbai Coastal Road

Mumbai Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोड अखेर खुला!

Posted by - March 11, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज दक्षिण मुंबईतील वरळी ते मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या कोस्टल रोडच्या (Mumbai Coastal…

लहान मुलांचे ‘बोरंनहाण’ म्हणजे काय ? कोणत्या वस्तूंचा करावा उपयोग , केव्हा करावे ;वाचा काय आहे महत्व..

Posted by - January 16, 2023 0
बोरंनहाण हा शिशुसंस्कार बहुतांश लोकांना परिचित आहे. लहान मुलांना बोरन्हाण घालण्याची प्रथा आहे. मकर संक्रांति पासून ते रथसप्तमी पर्यंतमुलांना बोरंनहाण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *