Yerwada Police Station

धक्कादायक ! येरवडा पोलीस स्टेशनमध्ये लाच घेताना हवालदाराला अटक

471 0

पुणे : पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ट्रॅव्हल व्यवसायिकाकडून अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी तेरा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या येरवडा पोलीस स्टेशन मधील हवलदाराला सोमवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. या लाच प्रकरणी आणखी दोन हवालदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
तक्रारदार यांचा ट्रॅव्हल्स एजन्सीचा व्यवसाय आहे. कारचा अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस हवालदार जयराम सावळकर, विनायक मुधोळकर राजेंद्र दीक्षित यांनी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती 13 हजार रुपये रक्कम हवालदार राजेंद्र दीक्षित यांनी येरवडा पोलीस स्टेशन येथे स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर अधीक्षक श्रीमती शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, सहाय्यक फौजदार मुकुंद आयाचित,पोलीस शिपाई भूषण ठाकूर,पांडुरंग माळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. पोलीस निरीक्षक भारत साळुंखे पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Accident News

Accident News : भीषण अपघात ! रिक्षाला पाठीमागून भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - December 24, 2023 0
सोलापूर : राज्यात अपघाताचे (Accident News) प्रमाण वाढतानाच दिसत आहे. सोलापूरमधून अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना…
Pune News

Pune News : धक्कादायक ! थर्टी फस्टची पार्टी बेतली जीवावर; इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - January 1, 2024 0
पुणे : सरत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण (Pune News) पाहायला मिळत आहे. मात्र या उत्सवाला…
Sharad Mohol Murder

Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणी आरोपींच्या अडचणींमध्ये वाढ ! न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय

Posted by - February 13, 2024 0
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) खून प्रकरणात न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणी कुख्यात गुंड…
Police Transfer

पुण्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Posted by - June 17, 2023 0
पुणे : महाराष्ट्र राज्य गृह विभागाने राज्यातील 449 पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या केल्या आहेत. यामध्ये काही निरीक्षकांच्या बदल्या विनंतीवरून तर…

महसूल तसेच भूमी अभिलेखांशी संबंधित सुधारणांचे प्रस्ताव सादर करा – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Posted by - September 24, 2022 0
पुणे : जमीन मोजणी, सात-बारा संगणकीकरण, ई-फेरफार आदी महसूल तसेच भूमी अभिलेखांशी संबंधित बाबींमध्ये कालानुरूप सुधारणा करत राहणे आवश्यक असून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *