Sharad Mohol

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येबद्दल पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली ‘ही’ महत्वाची माहिती

703 0

पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol) याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी घराजवळ कोथरुडच्या सुतारदरा भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या प्रकरणात पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर आज पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाबद्दल महत्वाची माहिती दिली.

नेमकं काय म्हणाले पोलीस?
कोथरुडमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार शरद मोहोळ साथीदारासोबत घराकडे जात असताना मुन्ना उर्फ साहिल पोळेकर आणि इतर दोघांनी रस्त्यातच गोळीबार केला. गोळीबारानंतर त्या ठिकाणाहून तिन्ही आरोपी पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तिथं चौकशी करण्यात आली. त्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पोळेकरचं नाव सांगितलं. तो सोबत असताना त्यानेच मोहोळवर गोळीबार केला. गुन्हेशाखेने तपासासाठी पथकं तयार केली. त्यात पोळेकरच्या घराचा, मूळ गावाचा शोध घेतला. तो सापडला नाही. तेव्हा तो दुचाकीवरून पळून गेल्याचं समजलं.

त्रयस्थ माणसाची गाडी होती. गाडीचा शोध घेतला असता ती बेवारस आढळली. पोळेकरकडे चार चाकी असल्याचं समजलं. गाडीचा नंबर ट्रेस केला. त्यानंतर शहराच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर शोध घेतला. त्यानंतर पथके रवाना झाली आणि सातारा रोडला शिरवळजवळ दोन कार जप्त करण्यात आल्या. यामधून 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. गोळीबाराची घटना घडली त्यात तिघांनी गोळ्या झाडल्या. तिन्ही पिस्टल जप्त केले आहेत. मुन्ना पोळेकरने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याच कामासाठी त्यांनी तीन-चार महिन्यांपूर्वी पिस्टल आणले होते. या घटनेत मुख्य आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर, त्याचा मामा नामदेव महिपती कानगुडे आणि विठ्ठल किसन गांडले यांचं शरद मोहोळसोबत वैमनस्य होतं. त्याच प्रकारातून हल्ला झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या गुन्हेगारांमध्ये 2 वकिलांचादेखील समावेश आहे. गुन्ह्यात त्यांची काय भूमिका हे तपासानंतर कळेल असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्येपूर्वी नेमकं काय घडलं होतं? ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

Sharad Mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या; CCTV फुटेज आले समोर

Kolhapur News : राजाराम कारखान्याच्या एमडीनंतर आता माजी अध्यक्षांना मारहाण; जमावाकडून गाड्यांची जाळपोळ

Pune News : शरद मोहोळ खून प्रकरणात ‘त्या’ दोन नामांकित वकिलांचा समावेश

Pune Crime : पुण्यात टोळीयुद्धातून आतापर्यंत कोणाकोणाची झाली हत्या?

Sharad Mohol Murder : शरद मोहळची हत्या कशी केली? पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Sharad Mohol : शरद मोहोळची गेम गॅंगमधील ‘त्या’ साथीदाराने केली; कोण आहे ‘तो’ व्यक्ती?

Share This News

Related Post

Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : पुणे महापालिकेने करावयाच्या पावसाळा पूर्व कामांसंदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांना दिले निवेदन

Posted by - May 22, 2024 0
पुणे : गेल्या आठवड्याभरात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहराच्या विविध भागांतील रस्ते जलमय होत आहेत. त्यामुळेच महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी करावयाची 90…

पिंपरी- चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय

Posted by - February 28, 2022 0
पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे 18 उमेदवार निवडून…
Sambhajinagar

छ.संभाजीनगरमध्ये बस आणि कारचा भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Posted by - June 6, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचं नाव घेईना. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) अशीच एक अपघाताची (Accident) घटना घडली…

पुनश्च हरिओम..! आजपासून राज्यात दहावीची ऑफलाइन परीक्षा सुरू

Posted by - March 15, 2022 0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहेकोरोनामुळे दोन वर्षांनंतर…

Rashmi Shukla : फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट

Posted by - September 8, 2023 0
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाकडून रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *