Sharad Mohol

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्येपूर्वी नेमकं काय घडलं होतं? ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

734 0

पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol Murder) याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी घराजवळ कोथरुडच्या सुतारदरा भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हत्येचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहे. आता या प्रकरणी हत्येपूर्वी नेमकं काय घडलं होतं ? याची माहिती समोर आली आहे.

गोळीबारापूर्वी नेमकं काय घडलं होतं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केला. शरद मोहोळचा खून करणारा मुन्ना पोळेकर महिन्याभरापासून शरद मोहोळकडेच काम करत होता. टोळीचा सदस्य म्हणून तो त्याच्या सोबत होता. पैशांच्या देवाणघेवाणीतून दोघांमध्ये खटका उडाला होता. घटना घडली त्यावेळी सकाळपासूनच हल्लेखोर हे शरद मोहोळ याच्यासोबत होते. संधी मिळताच त्यांनी मोहळ याच्यावर गोळीबार केला. मोहोळ याच्यावर त्याच्या घराजवळच कोथरुडच्या सुतारदरा भागात गोळ्याचे चार राउंड फायर करण्यात आले.

8 आरोपींना अटक
या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 9 पथकं पुणे ग्रामीण, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना केली. यादरम्यान पुणे-सातारा रोडवर किकवी-शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयीत स्विफ्ट गाडीचा पाठलाग करण्यात आला. यानंतर पोलिसांनी 8 आरोपी, 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राऊंड आणि दोन चारचाकी गाड्या ताब्यात घेतल्या.या 8 आरोपींमध्ये रवींद्र पवार आणि संजय उड्डाण या दोन नामांकित वकिलांचादेखील समावेश आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या; CCTV फुटेज आले समोर

Kolhapur News : राजाराम कारखान्याच्या एमडीनंतर आता माजी अध्यक्षांना मारहाण; जमावाकडून गाड्यांची जाळपोळ

Pune News : शरद मोहोळ खून प्रकरणात ‘त्या’ दोन नामांकित वकिलांचा समावेश

Pune Crime : पुण्यात टोळीयुद्धातून आतापर्यंत कोणाकोणाची झाली हत्या?

Sharad Mohol Murder : शरद मोहळची हत्या कशी केली? पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Sharad Mohol : शरद मोहोळची गेम गॅंगमधील ‘त्या’ साथीदाराने केली; कोण आहे ‘तो’ व्यक्ती?

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यात पहिला गुन्हा दाखल

MS Dhoni : धोनीला त्याच्या जवळच्याचं मित्रांनी लावला 15 कोटींचा चूना

Buldhana News : कोयता अन् देशी कट्टा घेऊन संतप्त शेतकऱ्याची बाजार समितीत घोषणाबाजी

Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू

Share This News

Related Post

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला भाजपा 5 लाख देणार – देवेंद्र फडणवीस

Posted by - April 10, 2022 0
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला भाजपा 5 लाख देणार असल्याची घोषणा महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली ते कोल्हापुरात…

धक्कादायक ! एकतर्फी प्रेमभंगातून तरूणीच्या 7 वर्षीय भावाचं अपहरण करून खून VIDEO

Posted by - September 10, 2022 0
पिंपरी-चिंचवड : प्रेमभंगाचा राग अनावर झालेल्या तरुणाने प्रेयसीच्या भावाचे अपहरण करून खून केल्याची खळबळजनक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. २०…

Pune Loksabha : पुण्यात लोकसभा निवडणुकीतील ‘हा’ उमेदवार प्रचार खर्चात अव्वल; तर ‘या’ उमेदवाराने केला सर्वात कमी खर्च

Posted by - May 16, 2024 0
पुणे : पुणे ,शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीच मतदान सोमवारी पार पडले आहे. मात्र, पुणे मतदारसंघामध्ये उमेदवारांनी लाखोंने पैसे निवडणूक प्रचारात खर्च…
jagdish mulik

Pune Loksabha : माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Posted by - May 13, 2024 0
पुणे : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *