Sharad Mohol Murder

Sharad Mohol Murder : गुन्हेगारी जगतात नव्या बकासुराची एन्ट्री? दोस्तीत कुस्ती करणारे मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे नेमके आहेत तरी कोण?

1313 0

पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol Murder) याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी घराजवळ कोथरुडच्या सुतारदरा भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शरद मोहोळची हत्या मुन्ना पोळेकर याने केली. हा मुन्ना पोळेकर नेमका कोण आहे? त्याने शरद शरद मोहोळची हत्या का केली? याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…

कोण आहे मुन्ना पोळेकर?
मुन्ना पोळेकर हा नामदेव उर्फ पप्पू कानगुडेचा भाचा आहे. पोळकर याचे इन्स्टा अकाऊंट पाहिल्यावर त्याने ज्या काही पोस्ट केल्या आहेत त्यामध्ये आपल्या मामा आधारस्तंभ असल्याच्या अनेक पोस्ट आहेत. मामासोबत त्याचे अनेक फोटो असलेले पाहायला मिळतील.

कोण आहे नामदेव कानगुडे ?
नामदेव कानगुडे म्हणजेच मुन्नाचा मामा. मोहोळचा काटा काढायचं ठरलं तेव्हा कानगुडेही यात सहभागी झाला. मोहोळने अनेकांशी शत्रूत्स ओढावून घेतलं आणि त्याला कारण एकच होतं जमीनीचा व्यवहार… याच व्यवहारातून मुन्नाच्या मामाचे म्हणजेच नामदेव कानगुडेचे आणि मोहोळचे खटके उडाले होते भाचाच्या गुन्ह्यात मामानेही साथ दिली आणि मोहोळला संपवण्याचा डाव आखला.

मुन्नाने का केली शरद मोहोळची हत्या?
मुन्नाचे आणि शरद मोहोळचे पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद झाले. हा वाद फार जुना आहे. पुण्याजवळील मुळशी तालुक्यातील एका जमीनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं बोललं जातंय. पैसा ही अशी गोष्ट आहे जी सख्ख्या नात्यातही विष कालवते. अगदी रक्ताची नातीही संपवते आणि याच पैशापायी मोहोळलाही संपवलं. तेही त्याच्याच साथीदारांनी तर मुन्नाच्या या गुन्ह्यात त्याचा मामाही सहभागी झाला होता.

पुण्याच्या गुन्हेगारी जगतात नव्या बकासुराची एन्ट्री?
मोहोळच्या हत्येनंतर पुण्यात चर्चांना उधाण आलं आहे. शरद मोहोळच्या हत्येने गुन्हेगारी संपली कि पुण्याच्या गुन्हेगारी जगतात नव्या बकासुराची एन्ट्री झाली ह्या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच ठरवेल. असे असले तरी सर्वसामान्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलच्या ड्युप्लिकेटची मार्केटमध्ये हवा; नेमकी ‘ती’ लावण्यती आहे तरी कोण?

Sharad Mohol Murder : शरद मोहोळचा खून झाल्यानंतर पहिल्या दीड तासात काय घडलं? समोर आली ‘ही’ महत्वाची माहिती

Ravindra Waikar : ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ आमदाराच्या घरी ईडीचा छापा

Swati Mohol : माझा नवरा वाघ होता, मी वाघीण आहे, स्वाती मोहोळ यांनी घेतली आक्रमक भूमिका

Beed Crime : पतंग काढण्याच्या नादात 9 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Shahajibapu Patil : शेकापकडून शहाजी बापूंचा होमग्राउंडवरच करेक्ट कार्यक्रम! ‘त्या’ निवडणुकीत पत्कारावी लागली हार

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार

Ravindra Dhangekar : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून ‘भयमुक्त कोथरूड’ बनवा; आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

IPL 2024 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ! रोहित शर्माच्या ‘या’ हुकमी एक्क्याला झाला ‘तो’ आजार

Pandharpur News : धक्कादायक! तक्रार मागे घेत नाही म्हणून आरोपींनी दलित शेतकऱ्याला दिली ‘ही’ भयंकर शिक्षा

Supriya Sule : बारामती लोकसभा मतदार संघातील भजनी मंडळांसाठी भजन आणि अभंग स्पर्धेची पर्वणी

University of Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकपाल पदी निवृत्त न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे यांची नियुक्ती

Bilkis Bano Gangrape : बिलकिस बानो गँगरेप प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; शिक्षेतील सूट केली रद्द

Share This News

Related Post

मोठी बातमी! मनसेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह 4 जण पोलिसांच्या ताब्यात 

Posted by - May 4, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे बाबत राज्य सरकारला दिलेला अल्टीमेटम आज संपत असून याच मुद्द्यावरून मनसे…

जिल्हाधिकाऱ्यांकडून चांदणी चौक परिसरातील कामांची पाहणी अंतिम टप्प्यातील कामाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश

Posted by - March 15, 2023 0
पुणे : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी एनडीए चौकात (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत असलेल्या उड्डाणपूल आणि रस्त्याच्या कामांची…
Supriya-Sule

“गडकरी साहेब…! पुणे -सोलापूर महामार्गाकडे लक्ष द्या” – खासदार सुप्रिया सुळे

Posted by - November 9, 2022 0
पुणे : वाहतूक कोंडी ,वर्दळ, अरुंद रस्ते ,खराब रस्ते ,अपघात यांचे प्रश्न शहरात आणि शहरांबाहेर देखील ऐरणीवर येत असताना आता…

CRIME NEWS : पुण्यातील कुख्यात गुन्हेगारावर पोलीस आयुक्तांची स्थानबद्धतेची कारवाई

Posted by - September 8, 2022 0
पुणे : काही दिवसांपासून पुणे पोलीस आयुक्त यांनी पुणे शहर आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधात्मक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *