Pune News

Sharad Mohol Murder : शरद मोहळची हत्या कशी केली? पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

720 0

पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol Murder) याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी घराजवळ कोथरुडच्या सुतारदरा भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या साथीदारानेच त्याची गेम केली. आरोपी हा मोहोळ गँगचा सदस्य असून तो शरद मोहोळसोबत राहत होता. आता या प्रकरणी पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

कशी झाली हत्या? काय आहे संपूर्ण घटनाक्रम?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केला. शरद मोहोळचा खून करणारा मुन्ना पोळेकर महिन्याभरापासून शरद मोहोळकडेच काम करत होता. टोळीचा सदस्य म्हणून तो त्याच्या सोबत होता. पैशांच्या देवाणघेवाणीतून दोघांमध्ये वाद देखील झाला होता. घटना घडली त्यावेळी सकाळपासूनच हल्लेखोर हे शरद मोहोळ याच्यासोबत होते. संधी मिळताच त्यांनी मोहळ याच्यावर गोळीबार केला. मोहोळ याच्यावर त्याच्या घराजवळच कोथरुडच्या सुतारदरा भागात गोळ्याचे चार राउंड फायर करण्यात आले. या घटनेत शरद मोहोळचा मृत्यू झाला.

या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 9 पथकं पुणे ग्रामीण, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना केली. यादरम्यान पुणे-सातारा रोडवर किकवी-शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयीत स्विफ्ट गाडीचा पाठलाग करण्यात आला. यानंतर पोलिसांनी 8 आरोपी, 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राऊंड आणि दोन चारचाकी गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. कोथरूड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol : शरद मोहोळची गेम गॅंगमधील ‘त्या’ साथीदाराने केली; कोण आहे ‘तो’ व्यक्ती?

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यात पहिला गुन्हा दाखल

MS Dhoni : धोनीला त्याच्या जवळच्याचं मित्रांनी लावला 15 कोटींचा चूना

Buldhana News : कोयता अन् देशी कट्टा घेऊन संतप्त शेतकऱ्याची बाजार समितीत घोषणाबाजी

Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू

IND W Vs AUS W : आज भारत-ऑस्ट्रेलिया पहिला टी-20 सामना रंगणार

Nagpur News : महिलेचा पाठलाग, शिवीगाळ करणं आणि ढकलणं हा विनयभंग होऊ शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय

Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार

Jalgaon Crime : जळगावमध्ये भीषण अपघात; भरधाव कारने चौघांना उडवले

Ajit Pawar : कोणी कोणाला निवडून आणलं हे जिंकणाऱ्यालासुद्धा माहिती; अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Akola Murder : अकोल्यात मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या; समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण

Share This News

Related Post

Brijbhishan Singh

दिल्ली पोलिसांनी WFI अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरुद्ध दाखल केली चार्जशीट

Posted by - June 15, 2023 0
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा…
Noor Malabika Death

Noor Malabika Death : काजोलसोबत स्क्रिन शेअर केलेल्या ‘या’ अभिनेत्रीची राहत्या घरी आत्महत्या

Posted by - June 10, 2024 0
मुंबई : बॉलिवूड विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये अभिनेत्री नूर मालाबिका दासने (Noor Malabika Death) आत्महत्या केली…
Gautami Patil

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; पत्रकारांना मारहाण

Posted by - May 17, 2023 0
नाशिक : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) आणि वाद हे समीकरण आता संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. आपल्या नृत्याच्या जोरावर…
Crime

Chhatrapati Sambhajinagar Crime : छ. संभाजीनगर हादरलं ! धक्का लागला म्हणून तरुणावर प्राणघातक हल्ला

Posted by - November 9, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये दुचाकीचा धक्का लागल्याच्या शुल्लक कारणातून…
Maratha Reservation Suicide

Maratha Reservation : “मी गेलो तरी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे”; म्हणत तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - September 7, 2023 0
धाराशिव : जालन्यात जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) व कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी गेल्या 9 दिवसांपासून उपोषण सुरू केले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *