Sharad Mohol

Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याप्रकरणात ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

460 0

पुणे : शरद मोहोळ हत्या प्रकरणी दररोज नवीन माहिती समोर येताना दिसत आहे. शरद मोहोळच्या हत्येच्या (Sharad Mohol Murder) कटात दोन नामांकित वकीलांचा सहभाग होता. महत्त्वाचे म्हणजे हत्येपूर्वी आरोपींची वकिलांबरोबर मीटिंग झाली होती. शरद मोहोळवर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र तो यशस्वी ठरला नाही. त्यासाठी या गुन्ह्यातील इतर आरोपींची दोन्ही आरोपी वकिलांबरोबर बैठक झाली होती.दोन्ही आरोपी वकिलांना शरद मोहोळच्या हत्येची कल्पना होती अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.

कोण आहे ‘ते’ दोन वकील?
शरद मोहोळ खून प्रकरणातील दोन आरोपी हे वकील आहेत. दोन्ही आरोपी हे पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करत होते. रवींद्र पवार आणि संजय उड्डाण अशी आरोपी वकिलांची नावे आहेत. त्यापैकी एक वकील ॲड. संजय उढाण याचे एका आरोपीबरोबर खून करण्यापूर्वी संभाषण झाल्याचे तपासात समोर आले आहे. दोन्ही आरोपी वकिलांना खुनाची माहिती होती, असे पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले. आरोपींना कट रचण्यात आणि त्यांना पळून लावण्यात या वकिलांनी मदत केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शरद मोहोळच्या खून प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपावरून ॲड. रवींद्र पवार आणि ॲड. संजय उढाण यांना अटक करण्यात आली आहे..

काय घडले होते नेमके?
कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol) याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी घराजवळ कोथरुडच्या सुतारदरा भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sanjay Kakade : माजी खासदार संजय काकडेंच्या अडचणीत वाढ! भोसले सहकारी बॅंक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्यासह 18 जणांना नोटीस

Chhatrapati Sambhajinagar : उपचार सुरु असताना तरुणाला रॉडने मारहाण; घाटी रुग्णालयामधील घटना

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला ‘हा’ मोठा विक्रम ! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! दोन सख्ख्या भावांसह दोघांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

Pune Police : पुणे पोलिसांची विशेष मोहीम ! रात्रभर गन्हेगारांची धरपकड; तब्बल ‘इतक्या’ गुन्हेगारांना केली अटक

Share This News

Related Post

Arrest

Pune Crime : 8 महिन्यापासून फरार असलेला आरोपी ओंकार मोरे अखेर जेरबंद

Posted by - June 27, 2023 0
पुणे : 8 महिन्यापासून फरार असलेला आणि चोरीचे (Pune Crime) तब्बल 11 गुन्हे असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने…
Pune News

Pune News : किल्ला बनवा स्पर्धेतील विजेत्यांसाठी गडकोट किल्ल्यांची मोहिम चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

Posted by - December 28, 2023 0
पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Pune News) यांच्या हिंदवी स्वराज्यातील गडकोट किल्ले हे प्रेरणा देणारे आहेत. लहान…
Pune Crime

Pune Crime : पुणे हादरलं !19 वर्षीय तरुणाची जागेच्या वादातून निर्घृणपणे हत्या

Posted by - February 21, 2024 0
पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण (Pune Crime) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पुण्यात सिंहगड रस्ता परिसरात 19 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून…
Akola Crime

Akola Crime : अकोल्यातील ‘त्या’ 19 वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - August 9, 2023 0
अकोला : अकोला जिल्ह्यात (Akola Crime) 19 वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत तरुणी काजल (बदलेलं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *