Selfie Accident News

Selfie Accident News : सेल्फी ठरला जीवघेणा ! प्रबळगडावरून कोसळून 24 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

561 0

पनवेल : काही लोकांना सेल्फी (Selfie Accident News) काढायची खूप आवड असते. काहीवेळा सेल्फी काढण्यात ते एवढे गुंग असतात कि आपण कुठे आहोत याचे त्यांना जराही भान नसते. असाच एक सेल्फी 24 वर्षीय महिलेसाठी जीवघेणा ठरला आहे. सेल्फी काढताना पाय घसरल्याने माची प्रबळगडावरून खाली पडल्यामुळे या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. शुभांगी विनायक पटेल असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. ती पतीसोबत ट्रेकिंगला गेली असताना ही दुर्घटना घडली.

काय घडले नेमके?
शुभांगी पटेल आणि विनायक यांचे वीस दिवसापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघे लोणावळा येथे हनिमून साठी 28 डिसेंबर रोजी गेले होते. त्या ठिकाणाहून ते दुपारी 2 च्या सुमारास माची प्रबळ येथे ट्रेकिंगसाठी गेले. यावेळी शुभांगी सेल्फी काढत असताना तिचा पाय घसरला आणि ती वरून खाली पडली. हा सर्व प्रकार विनायक याच्या डोळ्यादेखत घडला. शुभांगी अंदाजे दीड ते दोन हजार फूट खाली कोसळली.

या महिलेला पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील आणि त्यांची शेडुंग चौकीचे कार्यरत पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या,स्थानिकांच्या आणि निसर्ग मित्र यांच्या मदतीने या महिलेला बाहेर काढण्यात आले. यावेळी फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले होते. तिला बाहेर काढल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Raigad Accident : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या बसचा ताम्हीणी घाटात भीषण अपघात

Kondhwa News : कोंढव्यातील जीममध्ये किरकोळ वादातून मारहाण; CCTV व्हिडिओ आला समोर

Farmer News : पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Accident : पुण्यातील जांभुळवाडी नवीन बोगद्यामध्ये भीषण अपघात

IND Vs RSA 2nd Test : फिटनेस टेस्टमध्ये शमी अपयशी; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूचा संघात समावेश

Karnatak News : शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यासोबत केले अश्लील चाळे; पालकांनी व्यक्त केला संताप

Yavatmal Crime : यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल

Flight Cancelled : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, हैदराबाद, गोव्याकडे जाणारी 14 विमाने रद्द

Pune Transport : पुण्यात 1 जानेवारी निमित्त वाहतुकीत होणार ‘हा’ मोठा बदल

Pune Crime : पुण्यातील येरवडा जेलमध्ये कैद्याची निर्घृणपणे हत्या

Share This News

Related Post

Manoj Jarange Patil

Maratha Reservation : आता फक्त दोन दिवस; आरक्षण मिळालं नाही तर…, जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन

Posted by - October 22, 2023 0
जालना : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण…
nilesh rane

पळपुटे ठाकरे म्हणून तुमची इतिहासात नोंद; निलेश राणेंची टीका

Posted by - May 11, 2023 0
मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून बहुचर्चेत असणारा राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने जाहीर केला. या निर्णयांमध्ये 16 आमदारांच्या अपात्रतेचा…
Ajit Pawar

Ajit Pawar : प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

Posted by - August 9, 2023 0
पुणे : “ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेला,…
Pune News

Pune News : इंदापूरच्या तहसीलदारांवर अज्ञाताकडून हल्ला; रॉडने केली गाडीची तोडफोड

Posted by - May 24, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune News) इंदापूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *