Satara News

Satara News : संपूर्ण गाव हळहळलं ! पोहता येत नसल्याने दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत

534 0

सातारा : सातारा जिल्ह्यातून (Satara News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील हिवरे (ता. कोरेगाव) येथे माती नालाबांधामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ऋतुराज रोहिदास गुजले (वय 14) आणि वेदांत रोहिदास गुजले (वय 12) असे दोन्ही मुलांची नावे आहेत. या घटनेमुळे हिवऱ्यासह परिसरात शोककळा पसरली आहे.

काय घडले नेमके?
काल शाळेला सुटी असल्याने त्यांची आई सुवर्णा गुजले यांनी दोन मुलांना शेतामध्ये नेले. आईचे खुरपणीचे काम चालले होते. यावेळी दोघे भावंडे शिवारात जनावरे चारत होती. दुपारी आईने दोन्ही मुलांना शेतात बोलावून जेवू घातले. पुन्हा ही मुले जनावरे चारण्यासाठी शिवारात गेली. दरम्यानच्या काळात ते दोघे शेताजवळ असलेल्या नाईक इनामदार शिवारातील माती नालाबांधात पोहण्यासाठी गेली. ऋतुराज यास पोहण्यास येत होते. मात्र, वेदांत यास पोहण्यास येत नव्हते. सायंकाळी पाच वाजता त्यांची आई त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी येथील शिवारात गेली तेव्हा माती नालाबांधा जवळ गेली असता तिला बांधाजवळ दोघांची कपडे दिसली. मात्र, दोघे मुले दिसली नसल्याने सुवर्णा गुजले यांनी ही माहिती त्यांचे पती रोहिदास गुजले यांना दिली.

रोहिदास हे साखर कारखान्यावर उसाचा ट्रॅक्टर घेऊन गेल्याने त्या ठिकाणी रोहिदास यांचा भाऊ नीलेश गुजले हा माती नालाबांधाजवळ पोहोचला. दरम्यान, गावातील तरुणांच्या मदतीने माती बांधामधील पाण्यात शोध घेतला असता रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान पाण्यामध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले. आपल्या पोटच्या लेकरांचे मृतदेह पाहून त्यांच्या आईने एकच आक्रोश केला. त्यांचा हा आक्रोश पाहून उपस्थित लोकांच्यादेखील डोळ्यात पाणी आले. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच वाठार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची फिर्याद निलेश गुजले यांनी वाठार पोलीस ठाण्यात दिली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार उदय जाधव करीत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : 40 फुट खोल पाण्याच्या टाकीत पडलेल्या 16 वर्षाच्या मुलीला अग्निशमन दलाच्या जवानांकडून जीवदान

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

Dinesh Phadnis Pass Away : CID फेम दिनेश फडणीस उर्फ ‘फ्रेड्रिक्स’ यांचे निधन

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या

Hingoli News : पिकअप आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात; बाईकचालकाचा जागीच मृत्यू

Sukhdev Singh Gogamedi : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची निर्घृणपणे हत्या

Revanth Reddy : अखेर ठरलं ! रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री; हाय कमांडने केलं शिक्कामोर्तब

Pune News : न्यायालयाने बंदी घातलेल्या चायनीज मांजावर कडक अंमलबजावणी करावी – नितीन कदम

Share This News

Related Post

मोठी बातमी! खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला अटक

Posted by - April 23, 2023 0
खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग याने आत्मसमर्पण केले आहे. त्याने मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे वृत्त आहे. वारिस पंजाब दे प्रमुख अमृतपाल…

राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला; नाना पटोले यांची राष्ट्रवादीवर टीका

Posted by - May 11, 2022 0
गोंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपशीच युती केली, असं सांगत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला,…
Shivsena MLA Disqualification

Shivsena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक ठरलं; ‘या’ दिवशी पार पडणार अंतिम सुनावणी

Posted by - September 27, 2023 0
मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या (Shivsena MLA Disqualification) सुनावणीप्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक…

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची ही घ्या यादी

Posted by - June 21, 2022 0
मुंबई- राज्यसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर विधान परिषदेतील विजयानंतर सावरलेल्या शिवसेनेला पुन्हा धक्का बसला आहे. शिवसेनेमधील क्रमांक दोनचे नेते, नगरविकास मंत्री…

एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांच्या चेहऱ्यावर अज्ञात तरुणाने काळे फासले

Posted by - February 1, 2022 0
इंदूर- एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांच्या चेहऱ्यावर एका अज्ञात तरुणाने काळं फासलं. ही धक्कादायक घटना इंदूरमध्ये आज, मंगळवारी घडली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *