crime satara

शेतात रस्ता बनवण्याच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

13003 0

सातारा : कोरेगाव तालुक्यातील खेड नांदगिरी या ठिकाणी शेतातून रस्ता नेण्याच्या कारणावरून दोन कुटुंब आणि नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबाकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या हाणामारीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
कोरेगाव तालुक्यामधील मौजे खेड नांदगिरी (ता. कोरेगाव) येथील झरा शिवार जमिन गट नं. ६८४ मध्ये तहसीलदारांच्या आदेशाने रस्त्याच्या कब्जा पट्टीची अंमलबजावणी सुरू असताना जमिनीतून रस्ता नेण्याच्या कारणावरून मोठा वाद निर्माण झाला. “उभ्या पिकातून जेसीबी घालायचा नाही”, असं सांगत शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी दमदाटी करत दोन कुटुंबांमध्ये तसेच नातेवाईकांमध्ये मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.

पापा की परीचा कारनामा : पार्किंगमध्ये उभ्या बाईक्सवर चढवली कार (Video)

पुण्यात नवरदेवाला पाठीमागे बसवून नवरीची बुलेटवरून रॉयल एन्ट्री; वऱ्हाडी बघतच राहिले

या प्रकरणी दोन्ही कुटुंबांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. या मारहाणीप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. तेजस उदयसिंह कदम, विठ्ठल प्रफुल्ल कदम, संदिप चंद्रकांत कदम, सारंगनाथ रामचंद्र कदम, रोहित रविंद्र कदम, सचिन बबन कदम, बबन गणपती कदम, रविंद्र रामचंद्र कदम, प्रफुल्ल गणपत कदम (सर्व रा. खेड नांदगिरी, ता. कोरेगाव) व शुभम सुरेश गोळे (रा. तडवळे, ता. कोरेगाव) यांनी बेकायदेशीर जमाव जमवून “आम्ही तुम्हाला येथून जावून देणार नाही, तसेच तुम्ही आमच्या शेतात पाय ठेवला, तर हात पाय काढीन. तुम्हाला जीवंत सोडणार नाही”, अशी धमकी तक्रारदार अर्जुन कदम, पुतणे सागर सत्यवान कदम, प्रतिक कमलसिंग कदम यांना हाताने, लाथाबुक्कयांनी मारहाण केली. अर्जुन विनायक कदम (वय ५९, रा. खेड नांदगिरी) यांनी हि तक्रार दाखल केली आहे. या परस्पर विरोधी दाखल झालेल्या प्रकरणाची कोरेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत तपास करीत आहेत.

Share This News

Related Post

Pune Crime News

Pune Crime News : मुंबई पुणे हायवेवर बनावट दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Posted by - January 30, 2024 0
पुणे : पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई (Pune Crime News) करण्यात आली आहे. जुना मुंबई पुणे हायवेवर राज्य…

TOP NEWS MARATHI : ‘भारत जोडो’ यात्रा काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देणार का ?

Posted by - September 8, 2022 0
देशाच्या राजकारणात कधीकाळी एकहाती वर्चस्व गाजवणाऱ्या काँग्रेसला मागील काही वर्षांपासून उतरती कळा लागली असून 2014 च्या मोदी लाटेत काँग्रेसची मोठी…
ST-Bus

ST Bus : प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! आता रेल्वेप्रमाणेच एसटी बसचं लोकेशन करता येणार ट्रॅक

Posted by - July 17, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. दररोज हजारो प्रवासी एसटी बसनं (ST Bus) प्रवास करतात.…
Manoj Jarange patil

Manoj Jarange Patil : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरबत पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं

Posted by - September 14, 2023 0
जालना : जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे गेल्या 17 दिवसांपासून उपोषण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *