Dead

धक्कादायक ! शेततळ्यात बुडून दोन मुलींसह महिलेचा दुर्दैवी मृत्यू

2495 0

सातारा : सातारा (Satara) जिल्ह्यातील कराड (Karad) तालुक्यातील पाडळी – हेळगाव (Padli – Helgaon) या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन मुलींसह एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. रागिणी रामचंद्र खडतरे (वय 4) (Ragini Ramachandra Khatare), वैष्णवी गणेश खडतरे (वय 15)(Vaishnavi Ganesha Khatare), शोभा नितीन घोडके (वय 32) (Shobha Nitin Ghodke) अशी मृत पावलेल्यांची नावे आहेत.

काय घडले नेमके?
कराड तालुक्यातील पाडळी – हेळगाव येथे माणिक पाटील यांच्या मालकीच्या शेततळ्यात एका महिलेसह दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं होते. मूळचे कराडच्या खराडे कॉलनीतील असलेले हे कुटुंब पाटील यांच्याकडे कामानिमित्त राहत होते.

पाडळी येथील शेततळ्यात त्याच परिसरात काम करणारे मजूर दररोज पोहण्यासाठी जात होते. यामध्ये लहान मुलांसह महिला तसेच पुरुषही सहभागी होत होते. आज नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी सर्व जण शेततळ्यात उतरले. ज्यांना पोहण्यास येत नव्हते त्यांच्या मदतीला तळ्यात दोऱ्या बांधल्या होत्या. पोहण्यास न येणारे या दोरीला धरुन तळ्यात उतरले यादरम्यान या तिघांच्या अतिभाराने अचानक ती दोरी तुटली आणि ते पाण्यात बुडू लागले. यानंतर बाकीच्या लोकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत त्यांचा बुडून मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या तिघींचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत.

Share This News

Related Post

राज्यातील सत्ता संघर्षाची होणार LIVE सुनावणी ; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Posted by - September 21, 2022 0
येत्या 27 सप्टेंबर पासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सत्ता संघर्षावर होणाऱ्या घटनापिठासमोरील खटल्याची सुनावणी आता थेट पाहता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा…

‘देवाचो सोपूत घेता की…’ डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत यांनी घेतली कोकणी भाषेतून घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Posted by - March 28, 2022 0
पणजी- गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सावंत यांनी कोंकणी भाषेत शपथ घेतली.…

मेट्रोच्या स्वागतासाठी बनवले मेट्रोच्या प्रतिकृतीचे की-चेन

Posted by - March 9, 2022 0
पंतप्रधान मोदींनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास सुरू झाला आहे.मेट्रोचा पहिला टप्पा कार्यान्वित झाल्यामुळे कोथरूड मधील वाहतूक कोंडी…
Nashik Accident

Nashik Accident : शाळेत जाताना घात झाला; आजोबांसह 2 नातींनी गमावला जीव

Posted by - April 16, 2024 0
नाशिक : नाशिकमधून (Nashik Accident) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गवरील मालेगावच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *