Satara Firing News

Satara Firing News : खळबळजनक ! वाई न्यायालयाच्या परिसरात आरोपींवर पूर्ववैमनस्यातून गोळीबार

557 0

सातारा : साताऱ्यातील वाई परिसरात एक धक्कादायक घटना (Satara Firing News) घडली आहे. यामध्ये न्यायालयात आणलेल्या तीन आरोपींवर पूर्ववैमनस्यातून गोळीबार (Satara Firing News) करण्यात आला आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. न्यायालय परिसरात गोळीबार झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

काय घडले नेमके?
वाई-मेणवली येथील हॉटेल मालकास खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असलेल्या कुख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, (रा. भुईंज) आणि निखिल तसेच अभिजीत शिवाजी मोरे (रा. गंगापुरी, वाई) यांच्या दिशेने गोळीबार करण्यात (Satara Firing News) आला आहे. दोन फायर करण्यात आले. मात्र, कोणीही जखमी झालेले नाही. गोळीबाराच्या घटनेने वाई न्यायालयाच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

सोशल मीडियाच्या युगात संयम आणि सहनशीलतेचा अंत – धनंजय चंद्रचूड

Posted by - March 5, 2023 0
समाजमाध्यमांवरील खोटय़ा बातम्यांच्या युगात सत्याचा बळी गेला आहे. संयम आणि सहिष्णुतेची कमतरता असलेल्या युगात आपण राहात आहोत, असे मत सरन्यायाधीश…

दुःखद : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन; सिनेजगतावर शोककळा

Posted by - November 26, 2022 0
पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झाल आहे. अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर सुमारे २० दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात…

मुलीला त्रास देत असल्याच्या आरोपावरून तरुणाला मारहाण ; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

Posted by - March 18, 2022 0
आपल्या मुलीला त्रास देतो असा आरोप करत मुलीच्या कुटुंबीयांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी…
Hingoli Triple Murder

Hingoli Triple Murder : तिहेरी हत्याकांडाने हिंगोली हादरलं ! आई- वडील भावाला संपवलं; मात्र ‘त्या’ एका चुकीमुळं आरोपीचं बिंग फुटलं

Posted by - January 16, 2024 0
हिंगोली : हिंगोलीमधून (Hingoli Triple Murder) एक हादरवून टाकणाऱ्या तिहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीसदेखील हादरले आहेत.…

उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा कायम राहणार- अजित पवार

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *