Satara Dead

मध्यरात्री पुण्याहून रिटर्न येताना टिप्परने दिलेल्या धडकेत दोघा मित्रांचा दुर्दैवी मुत्यू

18564 0

सातारा : आळंदी – पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर काल रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात (accident) झाला. आळंदी – पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर तांबमळा (फरांदवाडी) या ठिकाणी एका भरधाव टिप्परने दुचाकीस्वारांना जोरात धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती कि यामध्ये दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दोघेही फलटणमधील (Phaltan) रहिवाशी होते. या अपघाताने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
बुलेट क्रं. एमएच 11 सीपी 4778 वरून अमिर ताजुद्दीन शेख (वय 32, रा. शुक्रवार पेठ फलटण) 9Ameer Tajuddin Sheikh) आणि गणेश सुनिल लोंढे (वय 35, रा. मंगळवार पेठ, फलटण) (Ganesh Sunil Londhe) हे मध्यरात्री 12 वाजता पुण्याहून फलटणकडे येत होते. यादरम्यान तांबमळा येथील गुरू हॉटेलच्या पुढील बाजूस टाटा कंपनीच्या दहाचाकी टिप्परने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की,यामध्ये बाइकवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अमिर शेख हा बिर्याणी हाऊस चालवत होता, तर गणेश लोंढे याचा चायनिजचा गाडा होता. दोघांचाही मित्रपरिवार मोठा होता. त्यामुळे या अपघातात दोघांचाही मृत्यू झाल्याचे समजताच सर्वांनाच मोठा धक्का बसला. या प्रकरणाचा अधिक तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

Share This News

Related Post

Tesla Car

Tesla Office Pune Details : टेस्लाचं पहिलं ऑफिस पुण्यात होणार ! कुठे अन् किती असेल ऑफिसचं भाडं

Posted by - August 3, 2023 0
पुणे : जगप्रसिद्ध टेस्ला कारची निर्मिती करणारी टेस्ला (tesla) कंपनीने भारतात पाऊल ठेवण्याचे ठरवले आहे. यासाठी त्यांनी भारतात पहिलं कार्यालय…
Hingoli News

Hingoli News : दोघां भावांच्या मृत्यूने हिंगोली हळहळलं ! जिवंतपणी हातात हात घालून फिरले; मरतानादेखील एकमेकांची साथ नाही सोडली

Posted by - October 22, 2023 0
हिंगोली : हिंगोलीमधून (Hingoli News) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. कळमनुरी तालुक्यामध्ये असलेल्या शेवाळा या ठिकाणी 5…

महाराष्ट्रातील 70 वर्षांपूर्वीचा खटला न्यायालयात आजतागायत प्रलंबित; आरोपी आता जिवंत आहे की नाही त्याचाही नाही उल्लेख ! नेमका खटला काय आहे ?

Posted by - January 11, 2023 0
न्यायदानाला विलंब म्हणजे अन्याय असं म्हंटल जातं. पण असं असलं तरी देशातील विविध न्यायालयात कोट्यवधी खटले प्रलंबित आहेत. देशातील सर्वात…

वाहतूक कोंडी टाळण्यासाठीच्या उपाययोजनांना गती द्या; पुणे शहरातील रस्त्यांच्या कामांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा

Posted by - March 27, 2023 0
पुणे : पुणे शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेऊन वाहतूक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने करावयाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश…
Jalna News

Jalna News : जालना हादरलं ! SRPF जवानाने स्वत:वरच गोळी झाडून आयुष्याचा केला शेवट

Posted by - September 30, 2023 0
जालना : जालनामध्ये (Jalna News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका SRPF जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *