Sanjay and Sunil Raut

संजय राऊत यांना जवळच्या कार्यकर्त्याकडूनच धमकी? वाढीव सुरक्षेसाठी बनाव रचला?

571 0

मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकी दिल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. संजय राऊत यांच्यासह आमदार सुनील राऊत यांनाही जीवे मारणार असल्याचे धमकी देणाऱ्याने सांगितले होते. त्यानंतर आता संजय राऊत धमकीप्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. संजय राऊत यांना धमकावणारा हा सुनील राऊत (Sunil Raut) यांचाच निकटवर्तीय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकारामुळे संजय राऊत यांनी त्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी हा सगळा बनाव रचला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

खासदार संजय राऊत आणि त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांना धमकी दिल्याच्या प्रकरणामध्ये मयूर शिंदे नावाच्या व्यक्तीला कांजूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी केली असता तो सुनील राऊत यांचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले. धमकीप्रकरणातील आरोपी मयूर शिंदेचे संजय राऊत आणि सुनील राऊत यांच्यासोबतचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे वाढीव सुरक्षेसाठी हा सगळा बनाव रचल्याचे समोर आले आहे

मयूर शिंदेनी काय दिली होती धमकी?
“संजय राऊत यांनी सकाळचा भोंगा बंद करावा नाहीतर त्यांना गोळी घालेन. संजय राऊत यांना फोन उचलायला सांग ते घाबरले आहेत का? दोन्ही भावांना गोळी घालेन. दोघांना स्मशानात पाठवेन. एका महिन्याच्या आता दोघांनाही गोळी मारेन,” अशी आरोपीने धमकी दिली होती.

Share This News

Related Post

Yavatmal News

Yavatmal News : यवतमाळ हादरलं ! निंबी या ठिकाणी कारखाली येऊन 10 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

Posted by - August 24, 2023 0
यवतमाळ : पुसद तालुक्यातील निंबी येथे दि.23 ऑगस्ट 2023 रोजी चारचाकी वाहनाने दिलेल्या एका 10 वर्षीय चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली…

पुण्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची परिषद; राज्यात ड्रग्जविरोधात अभियान राबविणार : देवेंद्र फडणवीस

Posted by - January 14, 2023 0
पुणे : युवा पिढीला विळख्यातून सोडविण्यासाठी राज्यात ड्रग्जविरोधात व्यापक अभियान छेडण्यात येईल आणि त्यासाठीची रणनीती आखण्यात येत असल्याची माहिती राज्याचे…
Accident Video

Accident Video : मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनानं IPS अधिकाऱ्याला चिरडलं; Video आला समोर

Posted by - March 13, 2024 0
हैदराबाद : वृत्तसंस्था – तेलंगणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने राज्यात खळबळ उडाली (Accident Video) आहे. यामध्ये…
Nashik Crime News

Nashik Crime News : आईवडिलांचा आधार हरपला! नाशिकमध्ये इंजिनीअर तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; ‘त्या’ एका गोष्टीमुळे वाचू शकला असता जीव

Posted by - August 13, 2023 0
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik Crime News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये नाशिकच्या (Nashik Crime News) त्र्यंबक रोडवर…

#HEALTH WEALTH : दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी टिप्स; चांगले आणि दीर्घ आयुष्य जगायचे असेल तर या सवयी ताबडतोब अंगीकारा

Posted by - March 25, 2023 0
आजच्या धावपळीच्या जीवनात शरीर आणि मन निरोगी असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी निरोगी आहार, व्यायाम आणि निरोगी सवयी पाळणे आवश्यक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *