Sangli Crime

Sangli Crime : धक्कादायक ! शेत जमीन, घर नावावर करत नाही म्हणून मुलाकडून जन्मदात्याची हत्या

1885 0

सांगली : सांगली जिल्ह्यात (Sangli Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कडेगाव तालुक्यातील विहापूरमध्ये शेत जमीन आणि घर नावावर करत नसल्याने मुलानेच जन्मदात्या वडिलांचा खून केला आहे. या प्रकरणी सांगली पोलिसांनी (Sangli Crime) आरोपी मुलाला अटक केली आहे. तानाजी माने असे मृत वडिलांचे नाव आहे. ते विहापूरमध्ये कुटुंबासमवेत राहतात. शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.

काय घडले नेमके?
तानाजी माने यांचा मुलगा प्रदीप याला दारूचे व्यसन होते. गेल्या काही दिवसापासून त्याने वडील तानाजी यांच्याकडे शेत जमीन व घर नावावर करण्यासाठी तगादा लावला होता. परंतु, प्रदीपला दारूचे व्यसन असल्याने तानाजी हे मुलाच्या नावावर घर किंवा शेत जमीन करत नव्हते. यामुळे प्रदीपच्या मनात आपल्या वडिलांविषयी मोठ्या प्रमाणात राग होता.

यानंतर (Sangli Crime) घटनेच्या दिवशी प्रदीप हा शनिवारी दुपारी दारू पिऊन घरी आला. त्यानंतर पुन्हा वडील आणि त्याच्यामध्ये वाद झाला. त्यातून प्रदीपने वडील तानाजी यांना बेदम मारहाण करून त्यांचे डोके फरशीवर आपटून ठेचले.यानंतर गंभीर जखमी झालेल्या तानाजी माने यांना सांगलीमधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी कडेगाव पोलिसांनी आरोपी प्रदीप मानेला अटक केली आहे.

Share This News

Related Post

shruti jadhav

लातूरच्या सृष्टी जगतापने सलग 126 तास नृत्य सादर करत रचला जागतिक विक्रम

Posted by - June 4, 2023 0
लातूर : लातूरच्या (Latur) सोळा वर्षांच्या सृष्टी जगतापने (Srushti Jagtap) आज जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. सलग 126 तासापेक्षा अधिक…

शैक्षणिक बातमी : शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांसह वह्या देखील मिळणार मोफत

Posted by - November 7, 2022 0
शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबत विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं देखील कमी करण्यासाठी सध्या शिक्षण खातं काही योजनांचा विचार करते आहे. त्यात…

VIDEO : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री झालेलं बघायला आवडेल : अमृता फडणवीस

Posted by - August 20, 2022 0
पुणे : पवार कुटुंबियांची आणि राष्ट्रवादीची मजबूत पकड असलेल्या पुण्याच्या पालकमंत्रिपदी कुणाची नियुक्ती होणार, याकडे पुण्यासह राज्याचं लक्ष लागलंय. दरम्यान…

Breaking news ! 15 एप्रिल पर्यंत कामावर हजर व्हा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना हायकोर्टाच्या सूचना

Posted by - April 6, 2022 0
मुंबई- एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी मागील 5 महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या एसटी संपाबाबत उच्च न्यायालयाने…

एमपीएससीच्या पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल जाहीर; विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

Posted by - March 8, 2022 0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2019 च्या पोलीस उपनिरीक्षकच्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. तब्बल 3 वर्षानंतर हा निकाल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *