Sangli Accident

Sangli Accident : सांगलीमध्ये भीषण अपघात ! 4 ऊसतोड मजूरांचा जागीच मृत्यू

364 0

सांगली : सांगलीमधून एक भीषण अपघाताची (Sangli Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये ऊसतोड मजूरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर,10 ते 12 लोक जखमी झाले आहेत. ऊसतोड मजुरांला घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला एका ट्रकने मागून धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात झाला.

काय घडले नेमके?
सांगली सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला. ऊस तोडणीचे काम संपवून घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडकेत ऊसतोडणी मजुरासह चौघांचा मृत्यू झाला. तर तब्बल 10 जण जखमी झाले आहेत. मृतातील तिघे चिखलगीचे तर एक जण शिरनांदगीचा आहे. सदरची घटना नागपूर रत्नागिरी महामार्गावर कवठेमंकाळ तालुक्यातील नागज फाट्याजवळ मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोन महिला, एक मुलगा आणि एका लहान मुलीचा समावेश आहे.

शालन दत्तात्रय खांडेकर (वय 30 रा. शिरनांदगी), जगमा तम्मा हेगडे (वय 35),दादा आप्पा ऐवळे (वय 17) निलाबाई परशुराम ऐवळे (रा.चिक्कलगी) अशी या अपघातामध्ये मृत पावलेल्यांची नावे आहेत. या अपघातातील जखमींना उपचारासाठी कवठेमहांकाळ आणि मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Chandrakant Patil : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात

Uttanasana : उत्तानासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Pune Prakalp

पुण्यात तयार होणार पहिला कचर्‍यातून हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्प

Posted by - June 3, 2023 0
पुणे : शहरात तयार होणाऱ्या महाकाय कचऱ्याच्या डोंगराची डोकेदुखी येत्या दिवाळीपर्यंत बंद होणार आहे. महापालिका प्रशासन केंद्राच्या मदतीने दररोज 350…
Mumbai Video

Mumbai Video : देव तारी त्याला कोण मारी ! आधी स्कुटीला धडकला, मग रिक्षाच्या चाकाखाली आला चिमुकला

Posted by - October 1, 2023 0
विरार : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कधी चालकाच्या स्वत:च्या चुकीमुळे अपघात (Mumbai Video) घडतात, तर कधी दुसऱ्याच्या चुकांमुळे…

आषाढी एकादशीच्या दिवशी ‘असे’ करा व्रत,नक्कीच होईल फलप्राप्ती

Posted by - July 8, 2022 0
आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादशी म्हणजेच ‘आषाढी एकादशी’चे महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे.आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी,देवपोधी एकादशी,महाएकादशी,हरिशयनी एकादशी या नावाने…

आत्महत्या करण्यासाठी ती पुलावर चढली… पुण्यात वाहतूक पोलिसांनी वाचवले मुलीचे प्राण

Posted by - April 3, 2023 0
पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुणे शहरातील आरटीओ चौकात एक मुलगी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने पुलाच्या कठड्यावर चढली. मात्र जवळच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *