Sangli Accident

Sangli Accident : पोलीस होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं ! सरावासाठी जाताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

392 0

सांगली : सांगलीमधून (Sangli Accident) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पोलीस भरतीच्या सरावासाठी निघालेल्या तरुणांच्या दुचाकीला अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. सांगलीच्या रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील कळंबी या ठिकाणी हा अपघात झाला आहे.

कसा झाला अपघात?
शिरीष अमसिद्ध खंबाळे (वय 21) असे मृत तरुणाचे नाव आहे. शिरीष हा त्यांच्या मित्रांसमवेत दुचाकीवरून रत्नागिरी-नागपूर मार्गावरील भोसे येथून पोलीस भरती प्रशिक्षणाच्या सरावासाठी सांगलीतील जिल्हा क्रिडा संकुलाकडे निघाला होता. यावेळी रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव पिकप वाहनाने मागून दोन्ही दुचाकींना जोरदार धडक दिली. यामध्ये शिरीष हा जागीच ठार झाला तर त्याचे अन्य तीन मित्र हे गंभीर जखमी झाले.

या अपघातात जखमी झालेल्या तरुणांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विश्वजीत विजय मोहिते (वय 24), प्रथमेश उत्तम हराळे (वय 24), दोघे राहणार भोसे , प्रज्वल साळुंखे (वय 24) राहणार कसबे डिग्रज अशी गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. या अपघाता मध्ये जागीच ठार झालेल्या आणि जखमी तरुणांना शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी प्रशिक्षकांकडून करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bank Holiday : बॅंकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मार्चमध्ये ‘एवढे’ दिवस बँक राहणार बंद

Kumar Shahani : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कुमार साहनी यांचं निधन

WPL 2024 : शोभना आशाने 5 विकेट्स घेऊन रचला इतिहास

Weather Update : पुढील 3 दिवसांत राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Share This News

Related Post

Crime News

Crime News : ‘या’ भाजप आमदाराच्या पुतण्याची गोळ्या घालून हत्या

Posted by - March 6, 2024 0
पाटणा : बिहारच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये भाजप आमदाराच्या पुतण्याची भरदिवसा गोळी झाडून हत्या (Crime…

खुनाच्या आरोपाखाली जामिनावर बाहेर आलेल्या गुन्हेगारावर ‘मर्डरचा रिप्लाय मर्डर’ असे म्हणत कोयत्याने वार

Posted by - March 30, 2023 0
पुण्यात कोयता गँगवर पोलिसांनी धडक कारवाई केलेली असली तरी पुण्यात अजूनही कोयता गँगची दहशत कमी झालेली नाही. हडपसर भागामध्ये दोन…
Beed Accident

Beed Accident : रुग्णाला घेऊ जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Posted by - October 26, 2023 0
बीड : बीडमधून (Beed Accident) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून अहमदनगरकडे रुग्णाला घेऊन…
Ahmednagar News

Ahmednagar News : वाघाने खाल्ल्याचा बनाव करत मुलीने प्रियकरासोबत ठोकली धूम; सत्य समोर येताच सगळेच हादरले

Posted by - May 14, 2024 0
अहमदनगर : अहमदनगरमधून (Ahmednagar News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका मुलीने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी एक धक्कादायक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *