Ayush Prasad Accident

Ayush Prasad Accident : पुणे झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा भीषण अपघात

490 0

पुणे : राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा भीषण अपघात (Ayush Prasad Accident) झाला आहे. बुधवारी दुपारी पुणे-नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात (Ayush Prasad Accident) झाला आहे. आंबेगाव तालुक्यातील एकलहरे या ठिकाणी हा भीषण अपघात झाला. या अपघातातुन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद थोडक्यात बचावले आहेत.

Indian Passport: भारतात ‘या’ 3 रंगाचे पासपोर्ट वापरले जातात; जाणून घ्या प्रत्येक पासपोर्टचे महत्व

काय घडले नेमके?
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे बुधवारी पुण्यावरून जुन्नर येथे केंद्रीय सचिव दौऱ्यासाठी जात होते. यादरम्यान यावेळी मंचर शहर सोडल्यानंतर एकलहरे हद्दीत एका ट्रक चालकाने त्यांचे वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि गाडी त्यांच्या बाजूने दाबली. परंतु चालक दीपक शिंदे यांनी अपघात होऊ नये यासाठी ब्रेक दाबले. यात डिव्हायडरला धडकून पुढील डाव्या व उजव्या बाजूचे दोन्ही टायरचा स्फोट होऊन गाडी 30 फूट डिस्कवर घासत गेली. वाहन चालक शिंदे यांनी मोठ्या शिताफीने गाडी कंट्रोल केली.

Pune News : रात्री दरोडा घालण्याच्या तयारीत असताना शिवाजीनगर व डेक्कन पोलिसांकडून दरोडेखोरांना अटक

या अपघाताची (Ayush Prasad Accident) माहिती मिळताच मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आयुष प्रसाद यांच्या तब्येतीची विचारपूस केली. ही घटना घडली तेव्हा या वाहनामध्ये पोलीस,आयुष प्रसाद ,त्यांचे अंगरक्षक पोलीस हवालदार संजीव रामू पाटील प्रवास करत होते.

Share This News

Related Post

Manoj Jarange

Manoj Jarange : आंतरवालीत मनोज जरांगे यांनी केल्या ‘या’ 4 मोठ्या घोषणा

Posted by - January 28, 2024 0
जालना : मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. पण अजूनही लढाई संपलेली नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj…
Satara News

Satara News : सांगलीच्या तरुणाने साताऱ्यामध्ये उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल; अजिंक्यतारा किल्ल्यावर गेला अन्…

Posted by - October 4, 2023 0
सातारा : साताऱ्यामध्ये (Satara News) काल रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कराड येथे एका कॉलेजमध्ये शिकत असलेल्‍या…

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

Posted by - December 23, 2022 0
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसरीवाडा येथे आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्याचे…
Chandrakant Patil

Chandrakant Patil : रक्षाबंधनाचा उत्सव हा समाजात बंधुभाव वाढविणारा ठरावा – चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली भावना

Posted by - September 2, 2023 0
रक्षाबंधनाचा उत्सव हा केवळ भाऊ बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न राहता समाजातील बंधुभाव वाढण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा अशी भावना ना. चंद्रकांतदादा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *