Raigad Accident

Raigad Accident : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या बसचा ताम्हीणी घाटात भीषण अपघात

590 0

रायगड : रायगडमधून (Raigad Accident) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हीणी घाटात एक खासगी बस उलटल्याने मोठा अपघात झाला आहे.पुण्याहून कोकणात जात असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे तर 55 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

काय घडले नेमके?
पुण्याहून बस कोकणात येत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ताम्हिणी घाटात अवघड वळणावर बस उलटली आहे. या अपघातात बसमधील दोन प्रवासी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर काही प्रवासी जखमी असून काही प्रवासी बसमध्येच अडकले आहेत. अपघाताची माहिती मिळताच महाड, माणगाव इथून बचाव पथके, रुग्णवाहिका घटना स्थळाकडे रवाना झाल्या आहेत. कोंडेघर गावाच्या हद्दीत हा अपघात झाला.

ही बस पुण्याहून हरीहरेश्वर येथे पर्यटकांना घेवून येत असताना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोंडेघर गावाजवळ अवघड वळणावर उलटली. जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Police News : खाकी वर्दीतील रणरागिनी! ‘ज्या’ महिला पोलीस कर्मचाऱ्यामुळे हत्येची घटना टळली, त्यांचा पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केला सत्कार

Kondhwa News : कोंढव्यातील जीममध्ये किरकोळ वादातून मारहाण; CCTV व्हिडिओ आला समोर

Farmer News : पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Accident : पुण्यातील जांभुळवाडी नवीन बोगद्यामध्ये भीषण अपघात

IND Vs RSA 2nd Test : फिटनेस टेस्टमध्ये शमी अपयशी; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूचा संघात समावेश

Karnatak News : शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यासोबत केले अश्लील चाळे; पालकांनी व्यक्त केला संताप

Yavatmal Crime : यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल

Flight Cancelled : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, हैदराबाद, गोव्याकडे जाणारी 14 विमाने रद्द

Pune Transport : पुण्यात 1 जानेवारी निमित्त वाहतुकीत होणार ‘हा’ मोठा बदल

Pune Crime : पुण्यातील येरवडा जेलमध्ये कैद्याची निर्घृणपणे हत्या

Pune Video : पुण्यात कुऱ्हाड गँग सक्रीय ! कुऱ्हाडीने बेदम मारहाण करत आरोपींनी ग्राहकांना लुटलं

Share This News

Related Post

Ratan Tata

Ratan Tata : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी

Posted by - December 16, 2023 0
मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून मोठ्या उद्योगपतींना धमक्यांचे कॉल येत आहेत. मुकेश अंबानी, सायरस मिस्त्री यांच्यानंतर आता टाटा समूहाचे माजी…
Viral Video

Viral Video : ड्रेनेज साफ ​​करताना कामगाराच्या अंगावरून गाडी गेल्याने कामगाराचा मृत्यू

Posted by - June 26, 2023 0
मुंबई :देशभरात ड्रेनेज लाईन साफ करतांना विषारी वायूमुळे कामगारांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत. मुंबईतील कांदिवलीमध्ये एक धक्कादायक घटना…
Crime

धक्कादायक! अनैतिक संबंधातून महिलेसह दोन मुलांना दिरानं जिवंत जाळलं

Posted by - April 6, 2023 0
विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून अनैतिक संबंधातून महिलेसह दोन मुलांना दिरानं जिवंत जाळल्याची…
Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार हत्या प्रकरणातील संशयित राहूल हंडोरेला मुंबईतून अटक

Posted by - June 22, 2023 0
मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत (एमपीएससी) राज्यात तिसरा क्रमांक पटाकावित वन परिक्षेत्र अधिकारीपदाला गवसणी घालणाऱ्या (आरएफओ)…
Mumbai Railway

Mumbai : मुंबईतल्या ‘या’ 8 रेल्वे स्टेशन्सची नावे बदलणार

Posted by - March 12, 2024 0
मुंबई : मुंबईतील (Mumbai) ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावं आता बदलण्यात येणार आहेत. शिवसेना खासदार आणि लोकसभा गटनेते राहुल शेवाळे यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *