Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार हत्या प्रकरणातील संशयित राहूल हंडोरेला मुंबईतून अटक

877 0

मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत (एमपीएससी) राज्यात तिसरा क्रमांक पटाकावित वन परिक्षेत्र अधिकारीपदाला गवसणी घालणाऱ्या (आरएफओ) 26 वर्षीय तरुणीचा वेल्हे तालुक्यातील राजगड किल्यावरील सतीचा माळ परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह (Darshana Pawar Murder Case) आढळून आला होता. या प्रकरणामुळे (Darshana Pawar Murder Case) परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.

Darshana Pawar Murder Case : प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी आहे, पण जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा….दर्शना पवार शेवटच्या भाषणात म्हणाली…

संशयित राहूल हंडोरेला अटक
दर्शना आणि राहूल एकमेकांचे नातेवाईक. दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. दर्शनासोबत लग्न करण्याची राहूलची इच्छा होती. दोघेही एम पी एस सी ची परिक्षा देत होते. मात्र या प्रयत्नांमधे दर्शनाला आधी यश आले आणि तिने वन विभागाची परिक्षा उत्तीर्ण केली. वनअधिकारी बनण्याची फक्त औपचारिकताच उरली होती. त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहूल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एम पी एस सी ची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा… तो देखील परिक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल असे दर्शना आणि तीच्या कुटुंबीयांना सांगून पाहिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहूलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली. परिक्षेपूर्वी राहुलने दर्शना बरोबर ब्रेकअप केले होते. यानंतर दर्शना अधिकारी झाल्यानंतर तो पुन्हा लग्नासाठी दर्शनाच्या मागे लागला होता.

कोण आहे राहुल हांडोरे?
राहुल हांडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शाह गावाचा आहे. त्याने BSC चं शिक्षण पूर्ण केलं आहे. तर तो पुण्यात MPSC ची तयारी करत होता. दर्शना आणि राहुल यांची ओळख पुण्यातच झाली होती. मागील काही महिन्यांपासून दर्शना आणि राहुल एकमेकांच्या संपर्कात होते.

Share This News

Related Post

Viral Video

Viral Video : धक्कादायक ! सुनेने सासऱ्याला रस्त्यावर पळवून पळवून हाणलं; Video आला समोर

Posted by - July 7, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रत्येक घरामध्ये छोटे- मोठे वाद होत असतात. मात्र काहीवेळा हे वाद विकोपाला जातात आणि एक…

आष्टी-अहमदनगर रेल्वे मार्गाची सर्व तयारी पूर्ण ; 23 सप्टेंबरला होणार लोकार्पण

Posted by - September 13, 2022 0
अहमदनगर : आष्टी-अहमदनगर रेल्वेचे संपूर्ण कामकाज पूर्ण झाले आहे. रेल्वेची ट्रायल देखील घेण्यात आली. येत्या 23 सप्टेंबरला आष्टी अहमदनगर रेल्वेचे…
Pune News

Pune News : धक्कादायक ! थर्टी फस्टची पार्टी बेतली जीवावर; इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - January 1, 2024 0
पुणे : सरत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण (Pune News) पाहायला मिळत आहे. मात्र या उत्सवाला…

गुगलवर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नव्हे तर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री

Posted by - August 7, 2022 0
महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेला सुरुंग लावून  महाराष्ट्रात मोठ्या सत्ता संघर्षानंतर भाजपच्या पाठींब्याने शिंदे सरकार स्थापन झालं खरं मात्र आता गुगलवर…
Meghna Bordikar

Meghna Bordikar : आमदार मेघना बोर्डीकर यांना ‘भारत गौरव पुरस्कार’ जाहीर

Posted by - May 9, 2023 0
परभणी : लंडन येथील भारतीयांच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘भारत गौरव पुरस्कार’ (bharat gaurav award) यंदाच्या वर्षी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *