accident

Pune News : डोक्यावरुन चाक गेल्याने पुण्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू

580 0

पुणे : पुण्यामधून (Pune News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेतून मुलीला घरी आणण्यासाठी निघालेल्या आईचा डंपरखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास कोकणे चौकात ही घटना घडली.पूनम सतेंद्र रातुरी (वय 41, रा. यश संकुल सोसायटी, पिंपळे सौदागर) असे मृत्यू झालेल्या आईचे नाव आहे. मृत महिलेचे पती सतेंद्र शिवानंद रातुरी यांनी वाकड पोलीस (Pune News) ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Accident News : समृद्धी महामार्गावर अजून एक भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

काय घडले नेमके?
एसएनबीपी शाळेच्या स्कूल बस दोन दिवस बंद राहणार असल्याचे शाळा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यामुळे कोकणे चौकात असलेल्या एसएनबीपी शाळेतुन मुलांना आणण्यासाठी आलेल्या पालकांच्या वाहनांमुळे कोकणे चौक ते एसएनबीपी शाळा परिसरात मोठी वाहतूक कोंडी होती. त्याच दरम्यान दुपारी दोन वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे त्या मुलगी श्रेयाला आणण्यासाठी आई पूनम ह्या दुचाकीवरून स्वराज चौकातून कोकणे चौकाच्या दिशेने जात होत्या.

यावेळी कोकणे चौकातून (Pune News) आलेल्या डंपरसमोर त्या अचानक पडल्या आणि डंपरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. त्या गंभीर जखमी झाल्या.त्यांना तात्काळ औंध हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले; परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Navi Mumbai News

Navi Mumbai News : छाती व श्वसनरोग विभागप्रमुखांना आला हार्ट अटॅक; 25 नामवंत डॉक्टर असतानादेखील कोणालाच वाचवता आले नाही

Posted by - August 7, 2023 0
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये डॉक्टरांची परिषद सुरू असतानाच हृदयविकाराचा तीव्र…

निलेश माझिरेचें नक्की झाले ! आज सायंकाळी होणार पक्षप्रवेश कार्यक्रम, ‘या’ पक्षात करणार प्रवेश

Posted by - December 15, 2022 0
मुंबई : पुण्यात मनसेच्या गोटातील अंतर्गत राजकारणामुळे अनेक खलबती घडल्या आहेत. मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर निलेश माझिरे आता कोणत्या पक्षात…

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासक कालावधीत वाढ निवडणुका

Posted by - July 15, 2022 0
पुणे : पुणे जिल्हा परिषदेची मुदत २१ मार्च तसेच पंचायत समित्यांची १३ मार्च रोजी संपुष्टात आली होती. त्यानुसार राज्यातील २५…

बांधकाम व्यावसायिक युवराज ढमालेंनी केलं फसवणुकीच्या आरोपांचं खंडण; कायदेशीर कारवाई करण्याचा दिला इशारा

Posted by - March 17, 2023 0
पुणे: कोंढवा येथील राजगृही बिझनेस हब कमर्शियल प्रिमायसेस सहकारी संस्थेची इमारत युवराज ढमाले, विकी संघवी व इतर विकासकांनी बांधली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *