Pune News

Pune News : खळबळजनक ! पुण्यात मायलेकींचे संशयास्पद स्थितीत आढळले मृतदेह

1984 0

पुणे : इंदापूर तालुक्यातील (Pune News) हगारेवाडी येथे मायलेकींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राहत्या घरात दोघी मृतावस्थेत आढळल्या आहेत. ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अश्विनी सागर म्हस्के (वय 28)वर्ष व सानवी सागर म्हस्के (वय 4) वर्षी अशी मृतांची नावे आहेत.आज शनिवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास या दोघींचे मृतदेह राहत्या घरातील पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने लटकल्याचे आढळून आले. शेजारच्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघींचे मृतदेह खाली उतरवले. मात्र, ही आत्महत्या आहे कि हत्या याचा तपास वालचंदनगर पोलीस करत आहेत.

या प्रकरणी वालचंदनगर पोलीसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या त्याच्यावर संशय असून त्याला ताब्यात घेऊन जात असताना संतप्त नातेवाईकांना सागर म्हस्के याला चांगलाच चोप दिला. यानंतर पोलिसांनी कशीबशी त्याची जमावाकडून सुटका करुन त्याला पोलीस ठाण्यात नेले. माय-लेकीच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने हगारेवाडी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या हत्येप्रकरणी जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांकडून घेण्यात आला आहे.

Share This News

Related Post

पुणे शहरावर अस्मानी संकट; झाडापडी, पाणी शिरणे, सीमाभिंत कोसळणे अशा घटनांनी पुणेकर हैराण ; आतापर्यंत शहरात घडल्या इतक्या घटना

Posted by - October 18, 2022 0
पुणे : दिनांक 17/10/2022 रोजी रात्री 9:45 वाजता पुण्यात मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली. गेल्या सव्वा तासात हवामान खात्याच्या शिवाजीनगर पर्जन्य…

मोठी बातमी ! उद्धव ठाकरेंच्या भाषणावर नाराजी व्यक्त करणाऱ्या शाम देशपांडेंची शिवसेनेतून हकालपट्टी

Posted by - May 19, 2022 0
पुणे- पुण्यातील शिवसेनेचे नेते शाम देशपांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ठेवण्यात आला…

अभय योजनेचा फायदा घेऊन पुन्हा थकबाकी ठेवणाऱ्या मालमत्ताधारकांवर कारवाईची मागणी

Posted by - April 19, 2022 0
पुणे- सन २०२०-२१ मध्ये अभय योजनेचा फायदा घेऊन मालमत्ता करात दंडमाफी मिळवलेल्या दीड लाख थकबाकीदार मालमत्ताधारकांपैकी ४५ हजार ७४५ मालमत्ताधारक…
Rajnikant

Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत यांच्या चाहत्यांकडून दोघांना जबर मारहाण

Posted by - August 11, 2023 0
दिग्गज अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांचा जेलर चित्रपट गुरुवारी (10 ऑगस्ट) रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची दाक्षिणात्य राज्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला…

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील सीबीआयच्या इमारतीचे आज उद्घाटन, दिल्लीतून ऑनलाइन उद्घाटन करणार

Posted by - April 3, 2023 0
पुण्यातील येरवडा येथे केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (सीबीआय) नव्याने बांधलेल्या कार्यालयीन इमारतीचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोमवारी (ता.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *